31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमप्रेयसीसोबत राहण्यासाठी क्रूर बापाने केली 2 वर्षीय चिमुकल्याची हत्या

प्रेयसीसोबत राहण्यासाठी क्रूर बापाने केली 2 वर्षीय चिमुकल्याची हत्या

मुंबईच्या धारावीत एका जन्मदात्या पित्याने स्वतःच आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचा हत्या केली. एवढेच नव्हे तर हत्या करून आरोपीने चिमुकल्याचा मृतदेह पिशवीत बांधून नाल्यात टाकून दिला या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गल्फ्रेंडच्या सांगण्यावरून त्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले. बुधवारी सकाळी पोलिसांनी नाल्यातून प्लास्टिकच्या पिशवीत मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली.

एका घटनेनं मुंबई शहर हादरुन गेले आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या 2 वर्षीय लेकाचा गळा घोटून हत्या केली आहे. नंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकून तो नाल्यात फेकून विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. धारावीच्या शाहूनगर परिसरात रेहमत अन्सारी याने प्रेयसीच्या सांगण्यावरून आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी बुधवारी सकाळी मुलाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काही तासांनंतर आरोपीला अटक करण्यात आली.

22 वर्षीय विवाहितेचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. प्रेयसीने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती की, पहिल्यांदा दोन वर्षाच्या मुलाला मारावे लागेल. प्रेयसीच्या सांगण्यावरून रेहमतने आपल्या दोन वर्षांच्या असदला घराबाहेर नेले. एका दुकानात त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दुकानातील प्लस्टिक पिशवीत त्याचा मृतदेह गुंडाळून मिठी नदीच्या पात्रात फेकून दिला. घरी आल्यानंतर असद सोबत नसल्याने पत्नीने विचारले असता, तो कुठे गेला, याबाबत माहित नसल्याचे रेहमत याने सांगितले. त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली.

बुधवारी पहाटे शाहू नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहीम-सायन क्रीक लिंक रोडवर केमकर चौकाजवळ मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी असद शेवटी रेहमत याच्यासोबत दिसल्याने त्यालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रेहमत याच्यावर पोलिसांनी उलटसुलट प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अखेर त्याने असदची हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेनेच संपूर्ण परिसरात शोकाकुल व्यक्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा:

‘नाहीतर अडचणीत येशील’; लॉरेंस बिश्नोई गैंगकडून राखी सावंतला धमकीचा मेल

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण ; सॅम राजपूत याचा शोध सुरू

IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार खंडणी प्रकरण सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता

Dharavi crime: Father kills two year old son throws body into creek held

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी