33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeक्राईमदर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण ; सॅम राजपूत याचा शोध सुरू

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण ; सॅम राजपूत याचा शोध सुरू

दलित विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्या बाबत त्याचा एक मित्र सॅम राजपूत याचा आता शोध सुरू आहे.मात्र, हे खरं पात्र आहे की खोटं याचा अजून पोलिसांना उलगडा झालेला नाही. त्याच प्रमाणे या प्रकरणात दर्शन सोलंकी याच्या बाबत जातीवादी पणा झाला आहे का, याबाबतचे पुरावे अजून एस आय टी ला सापडलेले नाहीत.

दर्शन सोलंकी हा 17 वर्षीय मुलगा पवई आयआयटी मध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता.12 फेब्रुवारी रोजी त्याने होस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.या घटनेने खळबळ माजली होती.दर्शन यांच्या सोबत जातीयवादी पणा झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता.सुरुवातीला या प्रकरणाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं होत.मात्र, दबाव वाढल्यावर या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टी बनवन्यात आली. एस आय टी च्या तपासात त्यांना दर्शन यांच्या रूम मधे एक चिट्टी सापडली. या चिट्टीत त्याने आपल्या मृत्यूस अरमान खत्री हा जबाबदार असल्याचं म्हटल्याने अरमान याला पोलिसांनी अटक केली आहे.तो सध्या जेल मध्ये आहे.

यानंतर दर्शन यांच्या मृत्यूस सॅम राजपूत हा देखील जबाबदार असल्याचं दर्शन याचे वडील रमेश सोलंकी यांचं म्हणणं आहे. यामुळे पोलीस आता सॅमचा शोध घेत आहेत.पोलिसांनी दर्शन याचा मोबाईल,लॅपटॉपची जुनी चाट परत मिळवली.मात्र,
त्यात त्यांना सॅम बाबत काहीच माहिती मिळालेली नाही.पोलिसांनी आयआयटी मध्ये चौकशी केली. पण या नावाचा विद्यार्थी आपल्या संस्थेत नाही असं, त्यांनी कळवलं आहे. यामुळे सॅम राजपूत हे टोपणनाव असावं का, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.त्या अनुषंगाने त्याचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

कारागृहातील हालचालींवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर !

लोकसंख्या आकडेवारीपेक्षा ‘या’ गोष्टींवर लक्ष द्या; अ‍ॅड. कपिल सिब्बल

IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार खंडणी प्रकरण सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता

काय आहे दर्शन सोलंकी प्रकरण

दर्शन सोलंकी हा मागासवर्गीय विद्याथी आहे.केंद्रीय मेरिट लिस्ट मधून त्याला पवई आय आय टी मध्ये मागासवर्गीय कोट्यातून प्रवेश मिळाला होता.तो होस्टेल मध्ये राहत होता. यावेळी त्याच्या सोबत होस्टेलला राहणारे वरीष्ठ जातीचे विद्यार्थी दर्शन सोलंकी सोबत जातीवादी पणा करत होते. त्याला सतत त्रास देत होते.त्याला प्रचंड मानसिक त्रास होत होता.यातून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं.सुरुवातीला दर्शनबाबत योग्य तपास व्हावा, त्याला न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलन झालीत.यामुळे या घटनेचा तपासाठी एस आय टी बनवण्यात आली.त्या नंतर कारवाईला सुरुवात झाली. एस आय टी च्या अधिकाऱ्यांनी प्रथम दर्शन याने आत्महत्ये पूर्वी लिहलेली चिट्ठी शोधून काढली. त्यानुसार अरमान खत्री याला अटक केली. एक आठवड्या नंतर तपास एस आय टी कडे सोपवण्यात आला त्या आधी पवई पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करत होते. त्यांना दर्शन ही सापडली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. पवई पोलिसांनी हा प्रकार जाणून बुजून तरी केला नाही ना, याबाबत ही तपास सुरू आल्याचं विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी