28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईमIAS अधिकारी राधेश्याम मोपलवार खंडणी प्रकरण सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता

IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार खंडणी प्रकरण सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता

राधेश्याम मोपलवार या आयएएस अधिकाऱ्यांकडे 10 कोटी खंडणी मागणाऱ्या खाजगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले आणि त्याच्या नातेवाईक यांची कोर्टाने मुक्तता केली आहे. 2017 सालातील हे प्रकरण असून यात सतीश मांगले , त्याची पत्नी श्रद्धा मांगले , मेव्हणा अतुल तांबे हे आरोपी होते.

राधेश्याम मोपलवार हे आय ए एस अधिकारी आहेत. 2017 सालात ते एम एस आर डी सि चे मॅनेजिंग डायरेक्टर होते.या काळात त्यांच्यात आणि त्याच्या पत्नी मध्ये वाद सुरू होता. पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी खाजगी डिटेक्टिव्ह असणाऱ्या सतीश मांगले यांची नियुक्ती केली होती. सुरुवातीला सर्व व्यवस्थित सुरू होत. सतीश मांगले सुरुवातिला सर्व माहिती देत होते. मात्र, मधेच मोपलवार आणि त्यांच्या पत्नी मध्ये समझोता करायचं ठरलं. यात सतीश पुढाकार घेत होता.मात्र,काही दिवसातच तो मामला फिसकटला.

यानंतर मोपलवार यांनी सतीश मांगले हा आपल्याकडे 10 कोटी रुपये खंडणी मागत असल्याची तक्रार पोलिसात केली. दरम्यानच्या काळात गँगस्टर रवी पुजारी याचा धमकीचा मोपलवार यांना फोन ही आला. हे प्रकरण गंभीर झाल्याने पोलिसांनी सतीश मांगले याच्या विरोधात खंडणीची गुन्हा नोंदवला. एवढंच नव्हेतर त्याच्या सह त्याची पत्नी श्रद्धा मांगले , मेव्हणा अतुल तांबे यांना अटक ही केली.यापैकी अतुल याला जामीन मिळाला आहे. बाकी दोघे अटक झाल्या पासून तुरुंगात आहेत.

हे सुद्धा वाचा

शाळेत मराठी सक्तीबाबत राज्य सरकारचा यू-टर्न !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ कामं !

मंत्रिमंडळ बैठकीतील हे आहेत महत्त्वाचे निर्णय

याबाबत आज या प्रकरणात मुंबई सेशन कोर्टाचे न्यायाधीश ए एम पाटील यांनी आपला निकाल दिला. यावेळी संवश्याचा फायदा देऊन तिन्ही आरोपीची मुक्तता केली.खंडणी साठी मांगले याने दोन वेळा आपल्याशी मिटिंग केली. पहिली मिटिंग कळवा खरेगाव टोलनाका येथे झाली तर दुसरी मिटिंग जुहू येथे झाली. जुहू येथील मिटिंगचे काही स्टिंग व्हिडिओ मोपलवार यांनी देण्याचा प्रयत्न केला.मात्र, निकाल देताना कोर्टाने काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. खारेगाव येथ नी मिटिंग झाली होती तिथे मोपलवार नव्हते. CDR च्या पुराव्या वरून त्यांची तिथे उपस्थिती दिसत नाही, अस कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी