क्राईम

नाशिक पोलिस कर्मचाऱ्यानेच केला अत्याचार

पोलीस कर्मचाऱ्यानेच लग्नाचे आमिष दाखवून एका पीडित महिलेवर वर्षभर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रक्षकच भक्षक बनल्याने महिला वर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे. याबाबत संशयित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक वर्षा सारंग पाटील करीत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, संशयित रोहिदास हिरामण गवळी, रा. सुभाषवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक हा पोलीस अंमलदार म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नोकरीला आहे. या त्याचे पीडित महिलेशी मैत्री झाल्यानंतर गवळी यांनी ८ ऑक्टोबर २०२२ ते ७ डिसेंबर २०२३ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून नाशिकमधील सीबीएस परिसरातील हॉटेल बसेरा आणि त्र्यंबक रोडवरील एका हॉटेलमध्ये नेवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, संशयित रोहिदास हिरामण गवळी, रा. सुभाषवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक हा पोलीस अंमलदार म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नोकरीला आहे. या त्याचे पीडित महिलेशी मैत्री झाल्यानंतर गवळी यांनी ८ ऑक्टोबर २०२२ ते ७ डिसेंबर २०२३ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून नाशिकमधील सीबीएस परिसरातील हॉटेल बसेरा आणि त्र्यंबक रोडवरील एका हॉटेलमध्ये नेवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता गवळी याने तिला वाईट शिवीगाळ करून दमदाटी केली होती. शेवटी लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार करत फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आल्याने तसेच, रक्षकच भक्षक झाल्याने तिने पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित पोलीस कर्मचारी रोहिदास गवळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंगावर पोलीस वर्दी घालून महिलेच्या अब्रूशी खेळ करणाऱ्या या नराधमावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करून त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्याची देखील मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे.

टीम लय भारी

Recent Posts

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

27 mins ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

32 mins ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

52 mins ago

चर बाबत शासनाकडून अद्याप प्रतिसाद नाहीच;पाणी कपातीचे संकट कायम

उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…

1 hour ago

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

14 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

14 hours ago