30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमदर्शना पवार खुन प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

दर्शना पवार खुन प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेत तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हांडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. घटनेच्या दिवसापासून राहुल हांडोरे फरार होता. राहुल वेगवेगळ्या राज्यात फिरत होता पाच दिवसांपासून पोलीस राहुलचा शोध घेत होते. पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत होती. अखेर पुणे पोलिसांनी राहुलला मुंबई मध्ये ताब्यात घेतल आहे. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये राहुलनेच दर्शना पवारचा खून केल्याचे कबूल केले आहे.

दर्शना आणि राहुल एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. अनेक वर्षांपासून दोघांची ओळख होती. राहुलला दर्शना बरोबर लग्न करायची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. मात्र दर्शनाला यामध्ये आधी यश मिळाले आणि ती एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन तिला वनअधिकार्याची पोस्ट मिळाली पण राहुल मात्र ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही.

हे सुध्दा वाचा:

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता , हवामान विभागाचा अंदाज

ज्या पेशव्यांनी होळकरांना त्रास दिला, त्याच पेशव्यांच्या टोप्या कशाला; छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

आव्हानाला सामोरे जाणे तुमचं-माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे; शरद पवारांनी फुंकले रणशिंग

दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले आणि तिच्या लग्नाच्या हालचाली सुरू केल्या होत्या. दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे जमवले म्हणून राहुल अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा तो ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे तिच्या कुटुंबियांन सांगून पहिले. पण त्याला काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने दर्शनाची हत्या केली. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे दुपारी याविषयी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.

दर्शन पवारच्या हत्येनंतर तिचा भाऊ आणि आई आक्रमक झाले आहेत. दर्शनाचा भाऊ म्हणाला की राहुलमुळे माझ्या बहिणीला खूप त्रास झाला आहे. त्याच्यामुळे आमची धडधाकट बहीण गेली. तुम्ही त्याला मारा नाहीतर आमच्या ताब्यात सोपवा . तर दर्शनाच्या आईने सुध्दा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देऊ शकते. माझी मुलगी गेलीय, तशा इतरांच्या मुली जाऊ नयेत. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर फाशी द्या. असे दर्शना पवारच्या आईने म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी