31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरक्राईमवेटरने अल्पवयीन मुलीला अगोदर डोळा मारला, नंतर स्पर्श केला; मग पोलिसांनी बेड्या...

वेटरने अल्पवयीन मुलीला अगोदर डोळा मारला, नंतर स्पर्श केला; मग पोलिसांनी बेड्या ठोकल्या

मुंबईतील हॉटेल्स महिला, मुलींसाठी सुरक्षित नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अनेकदा हॉटेलचे कर्मचारी महिलांसोबत गैरवर्तन करताना आढळून आले आहे. असाच एक घृणास्पद प्रकार सोमवारी एका नामंकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडला आहे. पीडित मुलीला ह़ॉटेलच्या वेटरने डोळा मारला, त्यानंतर तिला स्पर्श केला. याप्रकरणी पोलिसांनी वेटरला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी हॉटेलमध्ये आल्यानंतर आरोपी वेटर या मुलीकडे टक लावून पाहत होता. नंतर आरोपीने आगळीक करत मुलीला डोळा मारला. वेटर इतक्यावरच थांबला नाही त्याने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसेच आपला मोबाईल क्रमांक एका कागदावर लिहून तो मुलीच्या दिशेने फेकला. या प्रकारानंतर मुलीने तिच्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी शाहबाद खान (वय 19, मुळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली.

हे सुद्धा वाचा 
अडाणी समूहावर नवं संकट; कंपनीच्या शेअर्समध्ये झाली एवढी मोठी घट
मंत्री, सचिवांना व्हिडीओ कॉन्फरन्सची हौस; पण अधिकाऱ्यांना डोकेदुखी
ती लाचारी महाराष्ट्राला मान्य आहे का? भाजपा नंतर शिवसेना शिंदे गटाचा ठाकरे सेनेला सवाल

पीडित अल्पवयीन मुलगी आणि तीचे कुटुंब हे त्यांच्या मित्राच्या कुटुंबियांसह हॉटेलमध्ये जवण करण्यासाठी गेले होते. हे हॉटेल मुंबईतील नामंकित हॉटेल आहे. ज्यावेळी मुलगी तिच्या कुटुंबियांसह हॉटेलमध्ये गेली त्यावेळी वेटरने तिच्यासोबत गैरवर्तन केले. या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 354 (महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा), 509 कलमांखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी