32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयमंत्री, सचिवांना व्हिडीओ कॉन्फरन्सची हौस; पण अधिकाऱ्यांना डोकेदुखी

मंत्री, सचिवांना व्हिडीओ कॉन्फरन्सची हौस; पण अधिकाऱ्यांना डोकेदुखी

तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसांची कामे हलकी होतात. कामात अचूकता व प्रभावीपणा आणता येतो. पण तंत्रज्ञानाचे ‘साईड इफेक्टस्’ सुद्धा असतात. राज्यभरातील अधिकाऱ्यांना ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ (व्हिसी) नावाच्या तंत्रज्ञानाचे जबर साईड इफेक्टस् जाणवू लागले आहेत. जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना तर व्हिसी नकोशी वाटू लागली आहेत. व्हिसींचा मारा इतका होवू लागला आहे की, कार्यालयात बसून फक्त व्हिसींवरील बैठकांना उपस्थिती लावणे हेच एकमेव महत्वाचे काम उरल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. व्हिसींवरील बैठकांमुळे ‘फिल्ड’वर जाता येत नाही. अधिकार कक्षेतील इतर कामांवर लक्ष देता येत नाही. त्यामुळे व्हिसींची मारा कमी व्हावा, अशी भावना अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे.

विविध खात्यांचे मंत्री व सचिव वारंवार व्हिसींद्वारे बैठका आयोजित करीत असतात. विशिष्ट योजनांचा आढावा घेणे, अथवा इतर महत्वाच्या कामांसाठी व्हिसींद्वारे बैठकांचे आयोजन केले जाते. बैठक कोणत्याही खात्याची असली तरी तिथे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी अशा महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहावे लागते.

मंत्री, सचिव यांची बैठक असल्यामुळे ‘प्रोटोकॉल’नुसार बैठकांना उपस्थित राहावेच लागते. त्यासाठी इतर कामे रद्द करावी लागतात. या बैठकांचे वेळापत्रकसुद्धा बऱ्याचदा आयत्या वेळी निश्चित होते. सोमवारी व्हिसी होणार असेल तर रविवारी संध्याकाळी उद्याच्या बैठकीचा निरोप मिळतो. मंत्री व सचिव यांच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची असते. शिवाय प्रोटोकॉल सुद्धा असतोच. त्यामुळे सोमवारची अन्य कामे बाजूला ठेवून व्हिसींला हजेरी लावावी लागते.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अगोदरच अगदी आठवडाभरापासून कार्यक्रम निश्चित केलेला असला तरी तो या व्हिसींसाठी रद्द करावा लागतो. जनतेच्या दृष्टीने महत्वाची असलेली फिल्डवरील कामे सुद्धा आयत्या वेळी रद्द करावी लागतात. अधिकाऱ्यांना पूर्वी तळागाळात फिरून विकास कामांवर लक्ष देता यायचे. सामान्य लोकांमध्ये मिसळल्यामुळे तळागाळातील वस्तुस्थिती कळायची. त्यातून योग्य निर्णय घेण्यासाठी मदत व्हायची. पण व्हिसींच्या भितीमुळे आता तळागाळात जायची सोय राहिली नसल्याची नाराजी एका अधिकाऱ्याने नाव न घेता ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा 

शाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर रिलीझ; कमल हसन काय म्हणाला ?

राहुल गांधी 11 वर्षांनतर मुंबईत; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज

विशेष म्हणजे, मंत्री व सचिवांच्या बैठकांविषयी जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तशीच नाराजी जिल्हाधिकारी कार्यालयांविषय़ी तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांमध्ये आहे. मंत्री, सचिव आमच्यावर व्हिसींचा भडीमार करतात आणि आम्ही खालच्या अधिकाऱ्यांवर बैठकांचा भडीमार करतो. त्यामुळे व्हिसींवरील बैठकांविषयी संबंध अधिकारी वर्गामध्ये नाराजीचा सूर असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी