31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरव्यापार-पैसाअडाणी समूहावर नवं संकट; कंपनीच्या शेअर्समध्ये झाली एवढी मोठी घट

अडाणी समूहावर नवं संकट; कंपनीच्या शेअर्समध्ये झाली एवढी मोठी घट

गौतम अडाणी यांच्या अडाणी ग्रुप वर पुन्हा एकदा मोठे संकट कोसळले आहे. आज गुरुवारी, अडाणी ग्रुप च्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. शेअर्स बाजार खुला होताच अडाणी समूहाच्या सर्व दहा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये गुरुवारी सकाळी अडाणी इंटरप्राइसेस, अडाणी पोर्ट, अडाणी पॉवर, अडाणी ग्रीन एनर्जी, अडाणी सोल्युशन आणि अडाणी विलमरच्या शेअर्स मध्ये ४% घसरण दिसून आली. ऑर्गनाईसड क्राइम अँड करप्शनरिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) नामक संस्थेद्वारे अडाणी समूहावर करण्यात आलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर अडाणी समूहाच्या शेअर्स मध्ये घसरण दिसून आली.

ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टच्या (OCCRP) या अहवालानुसार, अडाणी समूहातील कंपन्यांनी गुपचूप शेअर खरेदी केले आणि स्टॉक एक्सचेन्जमध्ये लाखों डॉलर्सची गुंतवणूक केली. २०१३ ते २०१८ या काळात अडाणी समूहाने हा गैरव्यवहार केला.

अडाणी इंटरप्राइसेसच्या शेअर्स मध्ये ४.३% ची घसरण होऊन शेअर्सची किंमत २४०३.६० रुपये झाली आहे. अडाणी पोर्टच्या शेअर्समध्ये २.८१% ची घसरण होऊन शेअर्सची किंमत ७९५.९५ रुपये झाली आहे. अडाणी पॉवरचे शेअर्स मध्ये ४.५८% ची घसरण झाली असून शेअर्सची किंमत ३१३.३५ झाली आहे. अडाणी ग्रीन एनर्जीच्या शेअर्स मध्ये ४.३५% घट होऊन शेअर्सची किंमत ८०५.५ रुपये झाली आहे. अडाणी ग्रीन सोल्युशन च्या शेअर्समध्ये ४% घसरण झाली असून शेअर्सची किंमत ६२६.४० रुपये झाली आहे. तसेच, अडाणी विलमरच्या शेअर्स मध्ये १.८% ची घट होऊन शेअर्सची किंमत ३६२ रुपये झाली आहे.

OCCRP ने केलेल्या आरोपांवर अडाणी समूहाने एक निवेदन जारी केले आहे आणि त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. OCCRP ने केलेल्या आरोपांवर तिखट प्रतिक्रिया देत अडाणी समूहाने सांगितले, “हिंडनबर्ग रिपोर्टला पुनर्जीवित करण्यासाठी तसेच अडाणी समूहाला बदनाम करण्यासाठी परदेशी मिडियाद्वारे केला गेलेला एक प्रयत्न आहे. हे आपल्या विरोधातील एक कारस्थान असून जॉर्ज सोरोसने पाठबळ दिलेल्या संघटनांचे हे कारस्थान वाटत आहे.”

हे हि वाचा 

मंत्री, सचिवांना व्हिडीओ कॉन्फरन्सची हौस; पण अधिकाऱ्यांना डोकेदुखी

इंडियाच्या बैठकीत वडापाव, झुणकाभाकर, पुरणपोळी, श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्याची मेजवानी

पंतप्रधानपदासाठी तीन नावे, इंडिया आघाडीच्या बैठकीत होणार चाचपणी!

OCCRP या संघटनेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस हे फंडिंग करत असून नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर ते वारंवार टीका करत असतात. आधीच हिंडनबर्ग रीपोर्ट मूळे अडचणीत आलेल्या अडाणी समूहाला आता या नवीन अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी