30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमपुण्यातील तरुणीला हल्यापासून वाचवणाऱ्या तरुणांवर कौतुकाचा पाऊस

पुण्यातील तरुणीला हल्यापासून वाचवणाऱ्या तरुणांवर कौतुकाचा पाऊस

पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांड ताज असतानाच आत्ता पुन्हा एकदा पुण्यामध्ये सदाशिव पेठेत धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये एमपीएसची तयारी करणाऱ्या आणखी एका मुलीवर प्राणघातक हल्ला झाला आहे. आरोपी तरुणाने पीडित तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला केला. पण 2 विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे या तरुणीचे प्राण वाचले. पीडित तरुणी जखमी अवस्थेत धावत होती. पण कुणीही तिच्या मदतीला पुढे आले नाही. अखेर लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरुणांनी पुढे येत तिला मदत केली.

पोलीस उपायुक्त संदीप गित यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, आज 10 च्या सुमारास एसपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी आणि पीडित तरुणीची भेट झाली. या दोघांची पूर्वीपासूनच ओळख होती. दोघे एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे ते एकमेकांना चांगले ओळखत होते. पण काही कारणाने दोघांचे बोलणे बंद झाले. पण त्यानंतरही शंतनू तिच्यावर बोलण्यासाठी दबाव टाकत होता. तो तिला वारंवार फोन करत होता. त्याने आजही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अचानक त्याने तिच्यावर हल्ला केला . त्यात पीडित तरुणीच्या हातावर व डोक्यावर जखम झाली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. त्यांना सत्कारासाठी बोलावलं जातंय. पण हे असं कौतुक करू नका, उलट तुम्ही माझं कौतुक करुन उपकाराची भावना दाखवताय. मी त्या ताईवर उपकार केले नाहीत मी माझं कर्तव्य पार पाडलं तरीही सर्वांचे खूप खूप आभार असं लेशपाल जवळगे म्हणत आहे.

हे सुध्दा वाचा:

पालख्यांच्या आगमनासोबत भरणार वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्री येणार पंढरीत

सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण

यंदाचा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने , जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी