32 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeक्राईममुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दारुड्याला अटक

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दारुड्याला अटक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातून आलेल्या या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. 112 नंबरच्या हेल्पलाईन क्रमांकावर काल मध्यरात्री एक निनावी कॉल आला होता. यावर ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत एकाला पुण्यातील वारजे परिसरातुन एका दारुड्याला अटक केली आहे. राजेश आगवणे असे या आरोपीचे नाव असून हा पुण्याचा रहिवासी आहे. दारूच्या नशेत असताना त्याने हे धाडस केल्याचे उघडकीस आले आहे.

अचानक उद्भवलेल्या संकटासाठी तातडीने मदत मिळावी म्हणून 112 क्रमांकाचा हेल्पलाइन नंबर आहे. या नंबरवर कॉल केला तर आपल्याला पोलिसांकडून तातडीने मदत उपलब्ध होते. मात्र, या क्रमांकावर मदतीऐवजी आरोपीने धमकी देण्यासाठी कॉल केला. तेही या कॉलचा वापर आरोपीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीसाठी केला. पुण्यातील वारजे येथून हा कॉल आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. कॉलवर मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे. एवढे बोलून समोरील व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत आरोपी राजेशला अटक केली.

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दारुड्याला अटक
फोटो सौजन्न-गुगल : आरोपी राजेश आगवणे

दरम्यान, आरोपी राजेश हा मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्याची पत्नी कोथरूडला खाजगी ठिकाणी काम करते. तो तिला महिन्यातून दोन वेळा भेटायला येतो. त्याच्या पत्नी आणि परिचितांनी त्याच्या दारुच्या व्यसनाबाबत सांगितले आहे. तसेच तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असेही सांगितले. आरोपी राजेशने काल रात्री प्रथम 112 नंबर वर कॉल करून छातीत दुखत आहे अॅम्ब्युलन्स पाठवा असे कळविले होते. त्याला 108 नंबरवर कॉल करण्यास सांगितले. नंतर त्याने पुन्हा 112 नंबर वर कॉल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो दारुच्या नशेत होता.

हे सुद्धा वाचा:

मुख्यमंत्र्यांची केवळ फोटोसाठी तडजोड; आदित्य ठाकरे कडाडले

एकनाथ शिंदे करणार उद्धव ठाकरेंवर मात !

एकनाथ शिंदेंना तरुणाने सुनावले, तुम्ही एकतर छत्रपतींचे होऊ शकता किंवा सावरकरांचे!

Rajesh Agwane, CM Eknath Shinde, Rajesh Agwane threatened to kill the CM shinde has been arrested from Pune

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी