31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रिकेटMI vs DC: दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 'फ्लॉप गेम' बदलणार?

MI vs DC: दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ‘फ्लॉप गेम’ बदलणार?

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. सलग तीन पराभवामुळे निराश झालेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज मुंबई इंडियन्सविरुद्ध होम ग्राऊंडवर खेळण्यास उतरेल तेव्हा त्यांच्यापुढे विजयाचे खाते उघडण्याचे लक्ष्य असणार आहे. त्याचवेळी पाच चषकांचा मानकरी असलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे आव्हान असेल.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स तोंडघशी पडली आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहितच्या पलटणमध्ये चेन्नई सुपर किंग्सनंही मुंबईचा पराभव केला. मुंबईच्या स्टार खेळाडूंच्या पदरी आतापर्यंत निराशा पडली आहे. कर्णधार रोहित शर्मा स्वत: फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला आहे, तर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.

दोनही संघाचा गेम फ्लॉप!
मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी व गोलंदाजीत अपयशी ठरला आहे. यंदा संघाकडे फलंदाजीत रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन यांसारखे दिग्गज असूनही त्यांची फलंदाजी फ्लॉफ ठरली आहे. फक्त एन तिलक वर्मा यानेच आरसीबीविरुद्ध एकहाती 84 धावा केल्या होत्या. इतर फलंदाजांपैकी कोणी लढण्याची हिंमत दाखवताना दिसत नाही. जसप्रीत बुमराह नसल्याचा परिणाम आणखी किती दिवस संघावर दिसणार हे समजत नाही. त्याच्या जागी आलेला जोफ्रा आर्चर आरसीबीविरुद्ध अपयशी ठरला, तर चेन्नईविरुद्ध खेळलाच नाही. जेसन बेहरेडॉर्फ, अर्शद खान, पीयूष चावला यांनाही फारसे काही करता आलेले नाही.

त्याचप्रमाणे, दिल्ली कॅपिटल्सला आपला जिगरबाज कर्णधार यष्टिरक्षक ऋषभ पंत याची कमतरता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. कार अपघातात जखमी झालेला पंत स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या गैरहजेरीत संघाकडे वेगवान खेळ करणारा खेळाडू मिळेना झालाय. याशिवाय यष्टीमागेही त्यांना अडचणी येत आहेत. याशिवाय गोलंदाजीतही त्यांची म्हणावी तशी धार दिसत नाही. मुंबई विरुद्ध यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा: 

पॉइंटस् टेबल आयपीएल : RR अव्वल, KKR दुसऱ्या स्थानी

IPL 2023: गरिबाच्या पोराची कमाल; 5 चेंडूंवर 5 षटकार मारत रिंकू ठरला KKRचा हिरो

IPL 2023: गुजरात टायटन्सचं टेंशन वाढलं; कर्णधार पांड्या खेळातून बाहेर

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सर्फराज खान, अमन हाकिम खान, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, रोव्हमॅन पॉवेल रिली रोसो, एन्रिक नोर्जे, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, मुकेश कुमार, फिल सॉल्ट, लुंगी एन्गिडी, प्रवीण दुबे, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओस्तवाल, इशांत शर्मा, मनीष पांडे, कमलेश नागरकोटी, यश धूल.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, कॅमरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमनदीप सिंह, शम्स मुलानी, रिले मेरेडिथ, नेहाल वढेरा, ऋतिक शौकीन, अर्शद खान, डुआन जेनसन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मढवाल.

IPL 2023, MI vs DC, Mumbai Indians, Delhi Capital, IPL 2023: MI vs DC; Mumbai Indians fans hope to win match Against Delhi Capitals

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी