27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeबुद्ध पौर्णिमा: आज चुकूनही करू नका ‘ही’ कामं !
Array

बुद्ध पौर्णिमा: आज चुकूनही करू नका ‘ही’ कामं !

भगवान बुद्धांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेला बौद्ध जयंती म्हणून देखील ओळखले जाते. हा बौद्धांचा सर्वात पवित्र सण आहे. भगवान बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक होते आणि त्यांना विष्णूचा नववा अवतार अस सुद्धा ओळखलं जातं. भगवान गौतम बुद्धांनी जगातील दुःख दूर करण्यासाठी विविध मार्गांचे अनुसरण केले. यासाठी त्यांनी आपले घर सोडले आणि ध्यान आणि तपश्चर्येचा मार्ग अनुभवला. तथापि, वैशाखच्या शुद्ध पौर्णिमेला त्यांनी ज्ञान प्राप्त केले आणि त्यांना दु:खाचे मूळ नष्ट करण्याचा मार्ग सापडला. म्हणून हि पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

यंदा बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर 5 मे रोजी 2023 सालचे पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असेल, त्यामुळे सुतक कालावधी नसेल. तसे, चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. सुतक काळात अनेक प्रकारची कामे निषिद्ध आहेत. बुद्ध पौर्णिमेचे चंद्रग्रहण रात्री 08.45 वाजता होईल आणि ते उशिरा पहाटे 01:00 वाजता संपेल. हे चंद्रग्रहण काहींसाठी शुभ असेल तर काहींसाठी अशुभ ठरू शकते.

1. तुळशीची पाने तोडू नका: पौर्णिमेच्या रात्री चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. भगवान विष्णूंना तुळशीची पाने खूप आवडतात. तथापि, तुळशीची पाने केवळ पौर्णिमेच्या दिवशीच नाही तर इतर कोणत्याही रात्री तोडू नयेत. बुद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे, त्यामुळे चुकूनही तुळशीची पाने तोडू नका.

2. दही सेवन करू नका : चंद्रग्रहण काळात काहीही खाऊ नये. हे चंद्रग्रहण पौर्णिमेच्या रात्री होत असल्याने चुकूनही दही सेवन करू नये. यामुळे वित्तहानीसह जीवनात अनेक नुकसान सोसावे लागते. मात्र, इतर दिवशीही रात्री दही खाण्यास मनाई आहे.

3. मांसाहार आणि मद्य सेवन करू नका : गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांसाहार आणि मद्य सेवन करू नये. या गोष्टींचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. यातून लक्ष्मी दूर जाते. या दिवशी मांस आणि मद्य सेवन करणे अशुभ मानले जाते.

4. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी : यावेळी बुद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे, त्यामुळे गरोदर महिला आणि वृद्धांनी विशेष लक्ष द्यावे. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.

5. वडीलधाऱ्यांशी वाद टाळा: पौर्णिमेसह कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल, त्यांचा अपमान कराल तर चंद्र दोष आहे. चंद्र दोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते. पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो. अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील. चंद्राच्या बळावर धन, सुख आणि शांती मिळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘लय भारी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हे सुद्धा वाचा: 

अक्षय्य तृतीयेच्या आधी ‘या’ अशुभ गोष्टी घरातून काढून टाका; समृद्धी वाढेल

गुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी..!

संकटमोचन मारुतीला प्रसन्न करण्यासाठी आज करा ‘हे’ खास उपाय; नक्कीच यश मिळेल

Buddha Purnima 2023 : do’s and don’ts things in Buddha Purnima, Buddha Purnima 2023,  do’s and don’ts things in Buddha Purnima

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी