31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमवृध्द आरोपी पोलिसांना देत होता सहा वर्षे चकवा 

वृध्द आरोपी पोलिसांना देत होता सहा वर्षे चकवा 

एमआयडीसी पोलिसांना गेल्या सहा वर्षा पासून चकवा देणाऱ्या एका सत्तर वर्षीय आरोपी ला अखेर अटक करण्यात आली आहे.या आरोपी ला गुंजरात येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

सुशील मोदी यांचा गारमेंट चा व्यवसाय आहे. 2017 सालात त्यांनी एक व्यवहार केला होता.गौरी शंकर जोशी वय वर्षे 70 आणि महेंद्र चौधरी वय 58 वर्षे या दोघा सोबत हा व्यवहार केला होता. यावेळी आपण गुजरात मधील गारमेंट चे मोठे व्यापारी आहोत.आम्ही तुमच्या कडून बल्क मध्ये माल खरेदी करू अस त्यांनी सांगितलं होतं. मोठा व्यवहार होत असल्याने सुशील मोदी ही खुश झाले होते. दोन पार्टीत पहिला व्यवहार 2017 मध्ये झाला. जोशी यांनी मोदी यांच्या कडून दोन कोटी रुपयांच कापड खरेदी केलं.त्या बदल्या त जोशीने मोदी यांना पोस्ट डेटेड चेक दिला.मोदी यांनी जोशी यांना कापड दिलं.यानंतर ठरलेल्या तारखेला मोदी यांनी जोशी यांनी दिलेला चेक बँके त टाकला.यावेळी चेक वाटलाच नाही.तो बाऊन्स झाला.या प्रकाराने मोदी हवालदिल झाले.त्यांनी प्रथम जोशी यांना फोन करून पैसे देण्याची विनंती केली.पण जोशी पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.अखेर मोदी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याच बरोबर कोर्टात चेक बाऊन्स झाल्या बाबत केस दाखल केली. कोर्टात केस चालू होती. यावेळी जोशी आणि चौधरी दोघेही कोर्टात येत नव्हते.कोर्टाने त्यांच्या विरोधात अनेक समन्स काढले, वॉरंट काढले मात्र ते काही आले नाहीत. अखेर त्या दोघाना कोर्टाने फरार घोषित केलं.

एमआयडीसी पोलीस मात्र, त्या दोघांचा सतत शोध घेत होते. अधून मधून जोशी यांनी दिलेल्या पत्यावर पोलीस चौकशी करून , त्याचा शोध घेऊन परत यायचे.मात्र , दोघे काही सापडायचे नाहीत.त्यांनी मोबाईल वापरन कमी केलं होतं. त्याचा मोबाईल सतत बंद असायचा.कामा पुरता मोबाईल सुरू करायचे. घरी कधी तर येऊन जायचे.पण कुठे आहोत हे घरच्यांना ही सांगत नव्हते.त्यामुळे पोलीस हैराण होते.सहा वर्षे सतत त्यांचा शोध सुरू होता.

हे देखिल वाचा :

महाराष्ट्र भूषण : शिंदे सरकारच्या 42°© रणरणत्या उन्हातील इव्हेंटने घेतले 11 बळी

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार भारतात परत आणणार : सुधीर मुनगंटीवार

रेवदंडा म्हणजे, जणू माणसे घडविणारे विद्यापीठ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमआयडीसी पोलीस च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी सतीश गायकवाड हे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. लया वृद्ध आरोपी सापडत नाहीत हे त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं.त्यांच्या शोधा साठी एक पोलीस अधिकाऱ्यांची टीम बनवली.आणि या टीमला गुजरात मध्ये गैरातपुर येथे पाठवलं. पोलिसांनी गैरातपुर येथे जाऊन अनेक दिवस राहून सुमारे पन्नास ते साठ जनांची चौकशी केली.त्यातुन जोशी यांचा ठावठिकाणा मिळाला मग त्याला अटक केली. त्याच्या कडून चौधरी याची माहिती मिळवून त्याला ही अटक करण्यात आली.त्यांना मुंबईत आणण्यात आलं. कोर्टात हजर करून त्यांचा रिमांड घेण्यात आला.

गौरी शंकर जोशी आणि महेंद्र चौधरी हे आम्हाला चकवा देत होते.मात्र, आम्ही आमच्या तपासाच कसब वापरून त्यांना अटक केलीय.आणि कोर्टाच्या ताब्यात दिल.कारण कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं होतं.आम्ही प्राथमिक तपास करत आहोत. आरोपी सतत आपल ठिकाण बदलत होते.घरी ही यायचे नाहीत.मोबाईल ही वापरत नव्हते.यामुळे त्यांना अटक करणं अवघड जात होतं.पण आम्ही त्यांना अटक केलीच, अस एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.

The old accused was giving the midc police six years of chakwa

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी