33 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeजागतिकछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार भारतात परत आणणार : सुधीर...

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार भारतात परत आणणार : सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे लवकरच भारताला मिळणार आहे.

महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे लवकरच भारताला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त जगदंब तलवार व वाघनखे ब्रिटनकडून महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

यासंदर्भात ब्रिटिश सरकारचे भारतातील उपउच्चायुक्त ऍलॅन गॅम्मेल यांच्याशी मुंबईत सकारात्मक चर्चा झाली असून प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेच्यावेळी ब्रिटीश उच्चायुक्तालयातील राजकीय विभागविषयक उपप्रमुख श्रीमती इमोजेन स्टोन यादेखील उपस्थित होत्या.

शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्यशासन राज्यभर मोठ्याप्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा संकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याबाबत मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनमधे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रस्तावित बैठकीत जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याविषयी तपशीलवार प्रक्रिया ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणली जातील.

हे सुध्दा वाचा :

निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दातृत्ववान नेतृत्व; महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अर्पण

शिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे !

महाराष्ट्र भूषण: डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या गौरव सोहळ्यात रणरणत्या उन्हात लाखोंचा जनसागर लोटला

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत ब्रिटीश उपउच्चायुक्त अॅलन गॅम्मेल यांच्या झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, राज्य पुरातत्व संचालक तेजस गर्गे, चेतन भेंडे आणि मंत्री कार्यालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी