31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमला आजही वाटते मीच मुख्यमंत्री ! : देवेंद्र फडणवीस

मला आजही वाटते मीच मुख्यमंत्री ! : देवेंद्र फडणवीस

टीम लय भारी

नवी मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटत असल्याचे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. (devendra fadanvis to declare himself as cm)

“आपल्या सगळ्या भगिनींना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळावं. चांगल्या प्रकारच्या सोयी मिळाव्या, यासाठी अनेक योजना आपल्या काळामध्ये आपण राबवल्या आणि मला विश्वास आज (भाजप आमदार मंदा म्हात्रे) ताईंच्या कामामुळे महिलांना मोठा फायदा होईल.

आनंदवार्ता: दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात पीएफच्या व्याजाचे पैसे करणार जमा

अखेर नाट्यगृहे पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला, हे आहेत नियम?

नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असतील किंवा ताई असतील, यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झाला. देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे शहर नेहमी अग्रेसर राहिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल. नवी मुंबईची सेवा करण्याकरिता आमच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये मंचावरील मंडळी कायम तयार असतील”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“गणेश नाईक असतील, तुम्ही (भाजप आमदार मंदा म्हात्रे) असाल, पाटील साहेब असतील यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

MVA ‘threatened’ traders to participate in Maharashtra bandh, says Fadnavis

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी