30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रIndian Railway …आता रेल्वेस्थानकांवर स्पिटून वेंडिंग मशीन, थुंकण्यासाठी स्टिटून पाउचचा होणार वापर!

Indian Railway …आता रेल्वेस्थानकांवर स्पिटून वेंडिंग मशीन, थुंकण्यासाठी स्टिटून पाउचचा होणार वापर!

टीम लय भारी

नवी दिल्ली: स्वच्छ भारत करण्यासाठी देशभरात स्वच्छता मोहीमेला चांगलाच वेग आला आहे. रेल्वेला देखील हा खर्च न परवडणारा असल्याचे रेल्वे या समस्येवर एक उपाय योजला आहे. ( Indian Railway to keep spitting welding machine )

रेल्वे स्पिटून वेंडिंग मशीन लावणार आहे. ज्यातून थुंकण्यासाठी स्टिटून पाउच लोक खरेदी करू शकतात. या पाउच ची किंमत केवळ ५-१०रुपये इतकी असेल. देशातील जवळपास ४२ रेल्वे स्थानकांवर याचे स्टॉल लावण्याचा रेल्वेचा प्लॉन आहे.

…तेव्हा नथुरामच्या चिल्ल्या पिल्यांना काय वाटतं याच्याशी आपलं काही संबंध नाही : जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

MHADA Recruitment 2021 : लिपिक, अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती, १४ ऑक्टोबर अर्जाची शेवटची तारीख

स्वच्छता अभियानातंर्गत सतत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारकडून देखील वारंवार सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जाते. मात्र शहरांपासून रेल्वे स्टेशनपर्यंत अस्वच्छता दिसते. अनेक वेळा समाजावून देखील सार्वजनिक रेल्वे स्टेशनवर गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचा मोठा फटका हा रेल्वेला बसतो. गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी रेल्वेला करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत.

भारतीय रेल्वे दरवर्षी रेल्वेतील गुटखा खाऊन थुंकलेले डाग साफ करण्यासाठी जवळपास १२०० करोड रुपये आणि लाखो लीटर पाण्याचा वापर करत आहे. रेल्वे स्टेशनची संख्या त्याचप्रमाणे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांमुळे ही संख्या दिसून येत नाही. कोरोना काळातही स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र त्या काळातही गुटखा खाऊन थुंकण्याच्या सवयीत कोणताच बदल झालेला नाही.

रेल्वेला देखील हा खर्च न परवडणारा असल्याचे रेल्वे या समस्येवर एक उपाय योजला आहे. रेल्वे स्पिटून वेंडिंग मशीन लावणार आहे. ज्यातून थुंकण्यासाठी स्टिटून पाउच लोक खरेदी करू शकतात. या पाउच ची किंमत केवळ ५-१०रुपये इतकी असेल. देशातील जवळपास ४२ रेल्वे स्थानकांवर याचे स्टॉल लावण्याचा रेल्वेचा प्लॉन आहे. भारतीय रेल्वेने पश्चिम, उत्तर आणि मध्य रेल्वेच्या या योजनेसाठी नागपूरच्या स्टार्टअप ईजीपिस्ट कंपनीला पाउच तयार करण्याचे कॉन्ट्रक्ट दिले आहे. ही थुंकण्याची पिशवी कोणीही आपल्या खिशात सहजपणे ठेवू शकतो. हा थुंकण्याचा पाऊच बायोडिग्रेडेबल असून तो १५-२० वेळा वापरला जाऊ शकतो. थुंकी त्या पाऊचमध्ये गेल्यानंतर त्याचे एका वेगळ्या पदार्थात रुपांतर होते. वापरुन झाल्यानंतर हा पाऊच मातीत गाडला किंवा कचरा कुंडीत फेकला तरी चालेल, असे सांगण्यात आले आहे.

नागपूरमध्ये पाउच तयार करणाऱ्या कंपनीने अनेक रेल्वे स्टेशन्सवर ईडीस्पिट वेंडिंग मशीन लावायला सुरुवात केली आहे. नागपूर आणि औरंगाबाद महानगर पालिकेशी कंपनीने करार केले आहेत. एकूण ४२ रेल्वे स्थानकांसोबत कंपनीने करार केला आहे.

आधार कार्डमुळे फसवणूक टाळायची असल्यास लवकर हा क्रमांक अपडेट करा

Indian Railways’ major policy shift: Vande Bharat is back, and on fast track Read more at: 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी