31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयसमीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांच्या आरोपांचे केले खंडन

समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांच्या आरोपांचे केले खंडन

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा सपाटाच लावला आहे. समीर वानखेडे यांचे डॉ. शबाना कुरेशी यांच्या सोबत झालेल्या निकाहाचे फोटो मलिक यांनी शेअर केले आहे. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे (Dnyandev Wankhede’s reply to Nawab Malik).

माझ्या मुलाने पंधरा वर्षाची देश सेवा केली आहे. त्याच्या या कारकिर्दीत त्याच्यावर आरोप झालेला नाही. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्यामुळे मलिक द्वेषापोटी समीरवर आरोप करत आहेत. असे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

नवाब मालिकांनी जाहीर केला समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’

नवाब मलिकांच्या नवीन ट्विटनं राज्यात खळबळ…

ज्ञानदेव यांनी नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी मलिक हे सर्व आरोप करत असल्याचे ते म्हणाले. आम्ही धर्मनिरपेक्ष लोक आहोत. समीरने आईच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलीशी लग्न केले होते. त्यांनी विशेष विवाह कायद्यानुसार हे लग्न केले होते.

‘जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का ?’, NCP कडून पहिली प्रतिक्रिया

Nikah Was “Mother’s Wish”: Anti-Drugs Officer Rebuts Maharashtra Minister

हिंदू आणि मुस्लिम असल्यास निकाह बेकायदेशीर ठरवण्यात येतो. त्यामुळे समीरने त्याच्या आईच्या नावाने विवाहाची नोंदणी केलेली आहे. असे म्हणत मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी