संपादकीय

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येऊन ठेपलेला असताना सध्या “हर घर तिरंगा” चा प्रचार होताना दिसत आहे. ज्यांच्या संघाला स्वतंत्र्य भारताने स्वीकारलेला तिरंगा मान्य नव्हता ते आज हर घर तिरंगाचा प्रचार करत आहेत. मला इथे एक गोष्ट नमूद करावी वाटतेय भाजपच्या म्हणण्याप्रमाणे देशाला खरं स्वातंत्र्य जर सन 2014 साली मिळालं असेल तर मग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता कसा काय साजरा होऊ शकतो. 1947 साली खरं स्वातंत्र्य मिळाले नाही हे तुणतुण संघाचे (भाजप) लोक सातत्याने वाजवत असतात तर मग हा अमृत महोत्सव कशासाठी? (Azadi ka Amrit Mahotsav)

यांच्या म्हणण्याप्रमाणे भारत स्वतंत्र्य 2014 साली झाला. गेल्या 9 वर्षातील यांनी केलेला विकास हा सर्वश्रुत आहे. ज्या लोकांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदानचं नाही त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याविषयी बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. 2014 साली सोशल मिडीयाच्या क्रांतीने भारतात मोदी मोहिनी सुरु झाली, आणि देशाला ग्रहण लागले. शेतकरी, तरुण, आणि व्यापारी वर्ग यांना खोटी स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजपाने अक्षरश: संविधान व्यवस्था बदलण्याचे काम केले आणि तेव्हापासून केंद्राने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाने सामान्य जनता होरपळून निघत आहे.

सुरुवातीला नोटबंदी आणि जीएसटी, नोटबंदी केल्यानंतर पैसे बदलून घेण्यासाठी रांगांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले. काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयाने काळ्या पैशावर किती नियंत्रण मिळवले यावर अजून त्यांना उत्तर देता आले नाही. जीएसटी मुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. त्यानंतर जम्मु आणि काश्मीरचे 370 कलम रद्द् केले. 370 आणि 35 अ रद्द् झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये मारले गेलेल्यांच्या यादीत स्थानिक लोकांचीच नावं होती. त्याचप्रमाणे सीएए एनआरसी, मोदी सरकारच्या या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारतात तीव्र पडसाद उमटले.

हे सुद्धा वाचा

Shrikant Deshmukh : महिलेच्या फसवणूक प्रकरणी श्रीकांत देशमुखांना न्यायालयाचा तुर्तास दिलासा

Eknath Shinde: मंत्रीमंडळ विस्तारावर मजेशीर कविता !

शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह, भाकर फाऊंडेशनचा मार्गदर्शन उपक्रम !

2020 मध्ये कोरोनाचा विळखा संपूर्ण भारताचा गळा आवळत असताना मोदीजींनी परदेशात असणाऱ्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन वंदे भारत राबवले पण तिथेचं सामान्य गोरगरिबांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यानंतर आलेले कृषी कायदे, या कायद्यांवर उत्तर भारतातील लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध करुन हे कायदे मागे घेण्यास सरकारला भाग पाडले.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सरकारने कॉंग्रेस काळातील अनेक योजना आहेत तशाचं उचलून त्यांची फक्त नावं बदलली निर्मल भारतचे स्वच्छ भारत, ई-गव्हर्नन्स प्लान चे डिजीटल इंडिया, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंगचे मेक इन इंडिया, जन औषधीचे प्रधानमंत्री जन औषधी योजना अशा जवळपास 23 पैकी 19 योजना या कॉंग्रेस काळातून घेऊन त्यांच्या फक्त नावात बदल करण्यात आले. त्याचबरोबर भाजपला कॉंग्रेसचे इतके वावडे होते की त्यांनी कॉंग्रेसी व्यक्तींच्या नावावर असलेल्या पुरस्कारांची देखील नावे बदलली.

मोदीजींनी देशाच्या विकासाच्या नावावर रेल्वे विकली, एलआयसी विकली आणि त्यासोबत देशाची लोकशाही ही विकली, आणि सर्वोच्च न्यायालय, प्रसिद्धी माध्यामं, निवडणूक आयोग यांसारख्या गोष्टी खरेदी करुन निरपेक्ष लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून लोकशाहीचा कणा मोडला. खोट्या आश्वासनांचे गाजर दाखवून देशातील तरुणांना अंध भक्त बनविले,शिक्षण, रोजगार, गरिबी, देशाचा विकास या गोष्टी सोडून देशातला तरुण वर्ग आज फक्त हिंदुत्वाच्या गोष्टी बोलतो.हा आहे आपला विकास, कॉंग्रेस मुस्लिम धार्जिण आहे हे आजच्या तरुण पीढीच्या मनात फेक न्युजच्या माध्यमातुन बिंबवले गेले.

व्हॉट्सऍप नावाच्या युनिव्हर्सिटीचा वापर करुन देशातील जनतेचे ब्रेन वॉश केले आणि याला खत पाणी घालण्याचे काम गोदी मीडियाने केले. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा गुजरात मॉडेल, 2 कोटी रोजगार आणि राहिलेले 15 लाख, हे कधी येतील त्याचीच सामान्य नागरिक वाट पाहातोय. सध्या महाराष्ट्रात चाललेला राजकारणाचा नंगा नाच हे विखुरलेल्या लोकशाहीला प्रेरित करत आहे. मंत्र्यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाहता मग निरव मोदी, ललित मोदी, विजय माल्या यांच्यासारख्या कर्ज बुडव्यांना देशाबाहेर पाठवण्यासाठी मदत कोणी केली याचाही तपास होणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत 2022 साली देशातील बेरोजगारीचा दर हा उच्च पातळीवर आहे जो गेल्या 50 वर्षातील सर्वात जास्त दर आहे. देशाच्या होत जाणाऱ्या अधोगतीकडे अजुनही देशातील तरुण आवाज उठवताना दिसत नाही. आजपर्यंत भाजपने फक्त देशाला लुटण्याची कामं केली आहेत. देशामध्ये निरपेक्ष लोकशाही असण्यासाठी विरोधीपक्ष असणे फार गरजेचे आहे.परंतु भाजपसारख्या पक्षाची एक असुरी ईच्छा आहे ती म्हणजे सर्व पक्षांना संपवून देशात फक्त एकचं पक्ष निरंकुश राहावा.

आपला भारत देश आता हुकुमशाहीकडे वाटचाल करु लागला आहे. त्यामुळे मोदीजींची तुलना हिटलरसोबत करावी लागेल.

दिपाली कोकरे - शेंडगे

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

2 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

3 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

4 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

4 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

4 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

5 hours ago