28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रEknath Shinde: मंत्रीमंडळ विस्तारावर मजेशीर कविता !

Eknath Shinde: मंत्रीमंडळ विस्तारावर मजेशीर कविता !

एक महिना उलटून गेला तरी देखील राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल असे, जनतेला आश्वासन देत आहेत. एका महिन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक वेळा दिल्लीला जाऊन आले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या वेळी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली.

एक महिना उलटून गेला तरी देखील राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल असे, जनतेला आश्वासन देत आहेत. एका महिन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक वेळा दिल्लीला जाऊन आले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या वेळी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळेस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची शक्यता आहे, असे असतांना देखील मंत्री मंडळचा विस्तार लांबणीवर पडला आहे. राजकीय पेच प्रसंगाचा तिढा कोर्टात गेला असून, अजून निर्णय लागायचा बाकी आहे. मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने अनेक जण खिल्ली उडवत आहेत. अशीच एक मजेशीर कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कविता :
पाळणा काही हलेना…
झाला हनीमून झालं लग्न‍
द‍िल्लीवारीत दोघेही मग्न
दोघांच्याच गुलूगुलू गुजगोष्टी
तरीही काहीच होईना
विस्ताराचा पाळणा काही हलेना….
विस्ताराला मुहूर्त मिळेना
भटजीही झाले सैरभैर त्यांनाही काळी कळेना…
लग्न तर दिले लावून
तरीही सूत जुळेना
चोरुन भेटण्याची
लग्नाआधीची
मज्जा आता येईना….
मध्यस्थ झाली ईडी
घालून कानात बीडी
हाती काही लागेना
वऱ्हाडी झाली खुळी…

कवी:विलास संतराम इंगळे

राज्यात केवळ दोन डोक्यांचे सरकार आहे. राज्याचा गाडा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकाराने खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियाचा जमाना असतांना देखील अजूनही काही जण कविता करतात. त्यापैकी विलास संतराम इंगळे यांची ही विडंबनात्मक कविता वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. शिंदे फडणवीस सरकार आले. मात्र पुढच्या हालचाली होत नाहीत. या घटनेला त्यांनी लग्नाचे रुपक दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड !

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यात दोनच ‘टिकोजीराव’, जाणून घ्या कुणाबद्दल…

VIDEO : किरीट सोमय्यांचे पुढचे लक्ष्य अस्लम शेख

राज्यात एका बंडानंतर सत्तांतर झाले. ही घटना महाराष्ट्रासाठी ‘न भूतो न भविष्यती’ अशी आहे. मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील, असे सर्वांना वाटत असतांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हे बंड घडवून आणण्यासाठी अनेक महिने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांना चोरुन भेटत असल्याचे त्यांनी स्वत: मीडिया समोर सांगितले आहे. त्यामुळे इतके सगळे होऊन मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. राज्यात सरकार नाही. तरी देखील राज्याचा गाडा सुरळीत चालला आहे. जनता देखील या दोन डोक्यांच्या सरकारच्या कारनाम्याची मजा चाखत आहे. या घटनेची अनेक प्रकाराने खिल्ली उडवली जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी