33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeसंपादकीयDr. Ambedkar : डॉ. आंबेडकर जयंतीचा ‘इव्हेन्ट’ करू नका; विरोधक आपल्या बदनामीसाठी...

Dr. Ambedkar : डॉ. आंबेडकर जयंतीचा ‘इव्हेन्ट’ करू नका; विरोधक आपल्या बदनामीसाठी टपलेत’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Ambedkar ) यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी आहे. ही जयंती कशी साजरी करावी याबाबत माजी पोलीस अधिकारी अ‍ॅड. विश्वास काश्यप यांनी आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना आवाहनवजा पत्र लिहिले आहे. 

माझ्या धम्म बंधू भगिनींनो ,

सप्रेम जयभीम !

आंबेडकरी ( Dr. Ambedkar ) विचारांना मानणाऱ्या सर्व अनुयायांसाठी १४ एप्रिल हा सर्वोच्च आनंदाचा दिवस. प्रत्येकाचा जन्मदिवसच जणू.

परंतु या वर्षीचा हा सर्वोच्च उत्सव आपण सार्वजनिक पद्धतीने साजरा करायचा नाही. आपल्या भारत देशावर ‘कोरोना’चे भयंकर संकट आहे. सध्या आपण सर्वजण मिळून या संकटाचा सामना करीत आहोत.

डॉ. बाबासाहेबांची  ( Dr. Ambedkar ) जयंती ही दरवर्षीप्रमाणे १४ एप्रिल नंतरही पुढील दोन ते अडीच महिने साजरी होतच राहते. जगातील एकमेव नेता ज्यांची जयंती इतकी काळ चालते.

बंधू भगिनींनो,  या वेळेस मात्र आपण आपल्या बाबासाहेबांची ( Dr. Ambedkar ) जयंती घरातच साजरी करायची. घरात सामूहिक वंदना घेऊन, साधेच जेवण तयार करा कारण कोरोना मध्ये मयत झालेले आणि सध्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेले  आमच्या देशातील बांधव संकटात असतांना आम्ही गोडधोड कसे खाऊ शकतो?  घराबाहेर रांगोळी काढा. त्यात दिवा ठेवा. फुल मार्केट बंद असल्याने फुले आणि हार आणण्यासाठी घराबाहेर पडू नका.

घरातील सामूहिक वंदना, दारातील रांगोळी आणि त्यातील दिवा मात्र फेसबुक, व्हॉट्सअपवर बिनधास्त पाठवून द्या सगळीकडे.

आपआपल्या परिसरात दक्ष राहा.  एखादा ग्रुप सार्वजनिक जयंती करण्याचा हट्टच करीत असेल तर ते आपले बांधव नाहीत हे पक्के लक्षात ठेवा. तो ग्रुप हा समाजद्रोही आहे असे समजा. पोलिसांना त्या संदर्भात लगेच माहिती द्या. कदाचित आपल्या ‘विरोधकांकडून’ अशा ग्रुपला प्रोत्साहित केलेले असू शकेल. त्यांना आर्थिक मदत सुद्धा पुरवलेली असू शकेल. आपल्या समाजाला बदनाम करण्यासाठी.

त्यामुळे या १४ एप्रिलला जे हट्टाने सार्वजनिक ( Dr. Ambedkar ) जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतील ते समाजद्रोही असतील. समाजाला बदनाम करणारे असतील.

मित्रांनो, ‘कोरोना’चे संकट गेल्यावर मोठ्या धामधुमीने, दुप्पट उत्साहात आपल्या बाबासाहेबांची ( Dr. Ambedkar ) जयंती आपण सर्व मिळून साजरी करूया.

बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा नम्र विनंती. या वेळेस आपआपल्या घरातच जयंती साजरी करा. सार्वजनिक जयंती साजरी करणाऱ्यांना घरीच बसवा.

रात्री बारा वाजता तरुणांनी उगाचच टू व्हिलर घेऊन घराबाहेर पडू नये. हात जोडून नम्र विनंती भावांनो घरीच रहा. प्लीज, पालकांनी टू व्हिलरची चावी १३ तारखेला दुपारीच स्वतःकडे घेऊन ठेवा. गाडी बाहेर काढण्यास सक्त विरोध करा.

फटाके वाजवू नका. कारण फटाके वाजविण्यास आपल्याला बाहेर जावे लागणार. तुम्हाला पाहून आणखी २ ते ३, ३ ते ४ मित्र बाहेर येणार. मग त्याचा ‘इव्हेंट’ साजरा होणार. आपल्याला हेच नकोय. ‘विरोधक’ या साठीच टपलेत की कधी हे बाहेर येतील आणि आम्ही यांना कधी बदनाम करू.

भारत देश हा आपल्या सगळ्यांचा आहे. देशावरील संकट हे आपल्या घरावरचे संकट आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे बुद्धाचे अनुयायी आहोत.

बाबासाहेबांचे ( Dr. Ambedkar ) ऐतिहासिक वाक्य काय आहे ते पहा ….

मी प्रथम भारतीय आहे

आणि

अंतिम ही भारतीयच आहे.

जयभीम

नमो बुद्धाय

जय भारत.

आपला धम्म बंधू ,

अ‍ॅड. विश्वास काश्यप,

अध्यक्ष,

मी बुद्धिस्ट फौंडेशन, मुंबई

आणखी बातम्यांसाठी आणचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

AwhadvsBJP : ‘घाणेरडे लिखाण करणाऱ्या संघिष्ट कार्यकर्त्यांची भाजपने जबाबदारी घ्यावी’

Lockdown : माजी अधिकाऱ्याचे पोलीस बांधवांना पत्र

‘आपली चैत्यभूमी : ६ डिसेंबर संस्मरणीय प्रवासाची चित्रगाथा’

Coronavirus : मजूर कुटुंबातील चिमुकल्याने 10 हजार रुपये दिले मुख्यमंत्री निधीला

WHO : कोरोना व्हायरसबद्दलची माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी