31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रAwhadVsBJP : ‘ज्याला मारलं, तो यापूर्वीच गजाआड हवा होता’

AwhadVsBJP : ‘ज्याला मारलं, तो यापूर्वीच गजाआड हवा होता’

सुभाष वारे

ज्याला मारलं ( AwhadVsBJP ) त्याच्याबद्दल सहानुभूती असण्याच काही कारण नाही. त्याच्या विकृत पोस्ट, सामाजिक तणाव वाढवणाऱ्या पोस्ट पहाता तो आणि त्याच्यासारखे अनेक ट्रोलर्स कधीच गजाआड असायला हवे होते. त्यांनी केवळ सोशल मीडिया प्रदुषित केलाय एवढेच नव्हे तर त्यांच्या पोस्ट सतत समाजात द्वेषाचा विषाणू पसरवत आहेत.

जितेंद्र आव्हाड, शरद पवार ( AwhadVsBJP ) यांच्याबद्दल आणि इतर अनेकांच्याबद्दल मारहाण झालेल्या व्यक्तीने यापूर्वी पण केलेल्या पोस्ट या चीड आणणाऱ्याच आहेत. ही एक जमातच आधीच्या सत्ताधाऱ्यांनी ( AwhadVsBJP ) पोसलीय. पोलीस कस्टडीच्या नियमातले फटके अशा सर्वच ट्रोलर्सना कधीच बसायला हवे होते. आधीच्या सत्तेनेच त्यांना पोसलेले असल्याने त्यांच्या काळात हे घडले नाही. मात्र सत्ताबदलानंतर तरी अशा ट्रोलर्सवर कायदेशीर वचक बसवण्यासाठी पावले उचलणे आवश्यक होते.

AwhadVsBJP
अनंद करमुसे सोशल मीडियावर गलिच्छ पोस्ट टाकत असतो.

ते करायच्या ऐवजी मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ( AwhadVsBJP ) कार्यकर्त्यांनी मारहाणीचा मार्ग स्विकारला. हे जे घडलं ते चूकीच आहे. राज्याचे मंत्रीच कायद्याच्या मार्गाने आपला प्रश्न सोडवू शकत नाहीत हा संदेश लोकशाहीसाठी किती घातक आहे. मारहाणीच्या मार्गानेच प्रश्न सोडवण्याचा पायंडा पडला तर ते सर्वात जास्त घातक असेल. इथल्या गरीबांना, शोषितांना विविध प्रकारच्या सत्तास्थानी बसलेले जातदांडगे आणि धनदांडगे यांची मारहाण करण्याची व मारहाण करवून घेण्याची क्षमता केव्हाही जास्तच असते. त्यामुळे गरीब आणि शोषितांसाठी कायद्याच्या मार्गाचाच फक्त आधार असू असतो.

AwhadVsBJP
जितेंद्र आव्हाड यांचा फोटो माॅर्पिग करून अनंत करमुसे याने बदनामी केली होती

आता तुम्ही सत्तेत अहात. तुम्ही कायद्याचा धाक बसवून तुमचे स्वतःचेच नव्हे तर इतरांचेही प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र सरकारच्या कामामुळे सरकारबद्दल जनमत सकारात्मक बनत असताना सत्तेचा चुकीच्या पध्दतीने वापर करणाऱ्या अशा घटना सरकारच्या वाटचालीसाठी चांगल्या नाहीत हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सरकारचे मार्गदर्शक मा. शरद पवार समजून घेतील ही अपेक्षा.

 

 

AwhadVsBJP
अनंत करमुसे याने केलेली पोस्ट

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

AwhadvsBJP : ‘घाणेरडे लिखाण करणाऱ्या संघिष्ट कार्यकर्त्यांची भाजपने जबाबदारी घ्यावी’

Covid19 : सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना सवाल : महाराष्ट्राचा फंड घेतलात, पण तो महाराष्ट्रासाठीच वापरणार का ?

Coronavirus : मजूर कुटुंबातील चिमुकल्याने 10 हजार रुपये दिले मुख्यमंत्री निधीला

कोरोनाबद्दल WHO चा सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी