31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीययंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण

यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण

शिल्पा नरवडे

वसंताची पहाट घेऊन आली
नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची
गुढी उभारू आला चैत्र पाडवा..!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे गुढीपाडवा नेहमीप्रमाणे साजरा करता आला नाही. यावर्षीही चित्र वेगळं नाहीये. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने काही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

गुढीपाडव्यासाठीही सरकारने नियमावली जाहीर केली आहे. यंदाचा गुढीपाडवा घरीच्या घरीच साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. त्यामुळे मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी घरीच गुढीपाडवा साजरा करावा लागणार आहे.

शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण आहे.

हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकालाच आहे.

गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी प्रत्येक घरात जोरदार तयारी सुरू असते. पुजेसाठी लागणारी फुलं, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे सर्व साहित्य गुढीपाडव्यासाठी खरेदी केलं जातं. पण यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या या साहित्याची खरेदी न करताच गुढीपाडवा साजरा करणं गरजेचं आहे.

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी