29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंची मागणी जितेंद्र आव्हडानी फक्त ३ दिवसांत केली पूर्ण!

सुप्रिया सुळेंची मागणी जितेंद्र आव्हडानी फक्त ३ दिवसांत केली पूर्ण!

टीम लय भारी

मुंबई :- येत्या काही दिवसांत ताडदेवमध्ये १ हजार महिलांसाठी (वर्किंग वुमन्स) हॉस्टेल उभे करण्यात येणार आहे. ही घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आमदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरूणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. ही मागणी सुप्रिया सुळे यांनी तीन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पुर्तता केली आहे.

सुप्रिया सुळे यांची मागणी

मुंबईतील वर्किंग वुमन्ससाटी हॉस्टेल उभे करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत जितेंद्र आव्हाड यांना सूचना केली होती.

ताडदेवमध्ये वर्किंग वुमन्ससाठी हॉस्टेल उभारले जाणार

त्यानंतर आज ताडदेवमध्ये १ हजार वर्किंग वुमन्सना राहण्यासाठी हॉस्टेल उभे करत आहोत. येत्या दीड ते दोन वर्षात हॉस्टेल उभे करु. हे हॉस्टेल सर्व योनींनी सुसज्ज असेल असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. ‘म्हाडा’ कोरोना काळात कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार आहे. लोकांना वाचवण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी जे जे हवे ते करु, असे आव्हाड म्हणालेत.

‘म्हाडा’चे १०० प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले १०० प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय २५ मार्च रोजी घेतला आहे. तशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

आव्हाड यांनी २५ मार्च रोजी टाटा रुग्णालयाचे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी टाटा रुग्णालयापासून ५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे १०० फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देत असल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले. दरम्यान, आव्हाड यांनी ही संकल्पना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी