29 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeसंपादकीयदुर्गंधी जाईल, इतिहास राहील (डॉ. जितेंद्र आव्हाड)

दुर्गंधी जाईल, इतिहास राहील (डॉ. जितेंद्र आव्हाड)

डॉ. जितेंद्र आव्हाड

मंगळवार २७ जुलै २०२१ या दिवशी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत, मुंबईमधील बी. डी. डी. चाळींच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाला जेव्हा सुरुवात होईल, तेव्हा मुंबईच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू होणार आहे. महाराष्ट्राचा गृहनिर्माण मंत्री म्हणून माझा त्याला हातभार असेल, यासारखा काव्यात्मक न्याय मीळेल असे माझ्या आयुष्यात मला कधी वाटले नव्हते (I never thought in my life that I would get poetic justice).

चाळीच्या जीवनातील बरे वाईट पैलू मी ताडदेवच्या एका चाळीत (श्रीपत भवन) लहानाचा मोठा होताना भरपूर अनुभवलेत बाजूला असलेली टाटा कॉलनी आणि तिच्या बद्दलची असूया……. चाळ म्हणजे एक मोठे कुटुंब असते. तिथे घराचे दरवाजे जसे सताड उघडे असतात, तसेच शेजारंच्या मनाचेही. रक्ताचे नातेवाईक देणार नाहीत एवढा प्रेम, जिव्हाळा चाळीत मिळतो. पण त्याची किंमत वेगळया प्रकारे मोजावी लागते. मग ती नळावरच्या भांडणात असो, शेजारी चालणाऱ्या अंथोनीच्या हातभट्टीच्या अड्ड्यात असो, बाजूला चालणारा जानी शेटचा क्लब म्हणजे जुगाराचा अड्डा असो की विष्ठेने भरलेल्या तुंबलेल्या सार्वजनिक संडासात असो. या कडू गोड आठवणी आजही माझ्या मनातून जात नाहीत. हा ईश्वरी संकेत असावा किंवा पवार साहेबांची दूरदृष्टी असावी, मला गृहनिर्माण खाते मिळाले.

‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांचा भार हलका, शिक्षणात पंचवीस टक्के कपात; वर्षा गायकवाडांची माहिती

मुख्यमंत्र्यांची घोषणा; अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नातलगांना 5 लाखाची मदत

वास्तविक गेट वे ऑफ इंडिया, राजाबाई टॉवर, मुंबई विद्यापीठ किंवा छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, या इमारतींना जशी एक परंपरा आहे, तशीच ती बी. डी. डी. चाळींना सुद्धा आहे. आश्चर्य वाटेल, पण मुळात ब्रिटिशांनी 1920 च्या सुमारास या चाळी बांधल्या त्या पहिल्या महायुद्धातील युद्धकैद्यांना ठेवण्यासाठी. दरम्यान महारष्ट्राच्या खेडोपाड्यातून स्वातंत्र्या नंतर हजारो कुटुंबं पोटासाठी मुंबईत येत होती. युद्धकैदी परत गेल्यानंतर या कुटुंबांना इथे आसरा मिळाला. दारिद्र्याने गांजलेल्या, पण तरीही जीवनाशी संघर्ष करणाऱ्या मराठी माणसाचा झुंझारपणा यांचे प्रतिक म्हणजे या चाळी आहेत. 1942 ची चलेजाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य, दलित पँथरचा उठाव, गिरणी कामगारांचा संप, अश्या अनेक ऐतिहासिक घटना या चाळीनी पाहिल्या, आणि त्यात त्या तन, मन, धनाने सामील झाल्या (She saw many such historical events, and she joined them with her body, mind and money).

हे कितीही रोमांचक वाटत असले, तरी तिथला जगण्याचा स्तर कधी उंचावला नाही आणि चाळींच्या प्लास्टरसारखाच तो दिवसेंदिवस ढासळत गेला, ही सुद्धा नागडी वस्तुस्थिती आहे.

एकूणच मुंबईच्या चाळींमध्ये राहणारे लोक मोठ्या घरांच्या गरजेपायी ठाणे, दहिसर, मानखुर्दच्या पलीकडे फेकले गेले. मुंबईतून हद्दपार झालेल्या या लाखो मराठी माणसापैकी मी सुद्धा एक! पण मुंबईचे मराठीपण आणि तिचा लढवय्या इतिहास नव्या स्वरूपात जतन करायची जबाबदारी नियतीने माझ्यावर टाकली. हाती घेतले ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय सोडायचे नाही, ही पवार साहेबांची शिकवण आठवून कामाला लागलो (I started working by remembering the teachings of Pawar Saheb that I do not want to leave what I have taken for granted).

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता लष्करालाही केले पाचारण

Mumbai: Redevelopment of BDD chawls to kick start on July 27

नायगावच्या 42, एन. एम. जोशी मार्गावरील 32, आणि वरळीच्या 121, अशा 195 बी. डी. डी. चाळी पुनर्विकसीत होतील अशी योजना मी आखली. पवार साहेबांचा आशीर्वाद तर होताच, पण 100% हाडाचे मुंबईकर असलेले मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनीसुद्धा माझ्या योजनेला मंजुरी दिली.

गेली 25-30 वर्षे या चाळींच्या पुनर्विकासाच्या चर्चा चालू होत्या. बरेच नारळ फुटले. पण प्रत्यक्षात काहीएक झाले नाही. इथले रहिवासी वर्षानुवर्षे फक्त पुनर्विकासाची स्वप्ने पहात दिवस काढत होते. गरिबांच्या प्रश्नांना कोण प्राधान्य देणार? मी आत्मस्तुती करत नाही आहे. पण पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावताना, किंवा चाळीतल्या विविध संघर्ष संघटना ह्यांची समजूत काढून या चाळींसाठी ठोस योजना आखून ती क्रुतीत उतरवणे हे जिकिरीचे काम होते. पण ईच्छा असते तिथे मार्ग असतो याचा प्रत्यय मला आला. माझे सर्व सहकारी सुद्धा त्यासाठी खूप राबले.

I never thought in my life that I would get poetic justice
बी.डी.डी. चाळ

बी. डी. डी. चाळकऱ्यांना आता, मुंबईतून परागंदा व्हावे लागणार नाही की त्याच कुबट वातावरणात जगावे लागणार नाही. प्रत्येक घरात शौचालय, न्हाणीघर, नळ अशा सुविधा असलेले, त्यांच्या विद्यमान घरापेक्षा खूप प्रशस्त असे घर, त्यांना महविकास आघाडी सरकारतर्फे मोफत मिळणार आहे (They will get such a house for free from the Mahavikas Aghadi government).

मी अनुभवलेला घाण संडासांचा, पोटात मळमळ आणणारा दुर्गंध, जिन्यांमधला कोंदट वास हद्दपार होईल. मराठीपण, त्याचा लढवय्या इतिहास, आणि त्याच्या साक्षीदारांच्या पिढ्या तिथे दिमाखात जगतील!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी