33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयकै. प्रमोद महाजन चुकून भलतेच बोलले होते, अन् त्यामुळे अख्खी मराठी चित्रपटसृष्टी...

कै. प्रमोद महाजन चुकून भलतेच बोलले होते, अन् त्यामुळे अख्खी मराठी चित्रपटसृष्टी संतापली होती

तुषार खरात : टीम लय भारी

मुंबई : दिवंगत प्रमोद महाजन हे भाजपचे एकेकाळचे तगडे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्यानंतर महाजनांचा तिसरा क्रमांक होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही ते विश्वासातील नेते होते. त्यावेळी महाजन इतके मोठे नेते होते की, नरेंद्र मोदी यांना खिजगिणतीतही ग्राह्य धरले जात नव्हते. प्रमोद महाजन जेवढे मातब्बर होते, तेवढेच ते नम्र सुद्धा होते. आताच्या मोदी – शाह यांच्याप्रमाणे आडमुठे नव्हते (Pramod Mahajan had spoken by mistake).

प्रमोद महाजन किती नम्र होते याचा एक किस्सा तुम्हाला सांगते

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. कदाचित ते २००४ साल असेल. प्रमोद महाजन यांनी मंत्रालयाजवळील एका हॉटेलात पत्रकार परिषद घेतली होती. कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार याविषयी त्यांनी विस्तृत माहिती पत्रकारांना दिली. पत्रकारांनीही अनेक प्रश्न विचारले. महाजन यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. पत्रकार परिषद जवळपास संपलीच होती. पण तेवढ्यात एका पत्रकाराला प्रश्न विचारण्याची हुक्की आली.

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘ममता दीदी, ही तर सुरूवात, निवडणुकीपर्यंत एकट्याच राहाल’

देश स्वातंत्र्यात, जनता पारतंत्र्यात; मोदी सरकारची किमया

दुय्यम दर्जाच्या हिंदी वृत्तपत्रात काम करणारा हा पत्रकार होता. त्याने विचारलेला प्रश्न हास्यास्पद आहे, असे महाजन यांच्यासह तेथील सगळ्याच पत्रकारांना वाटले. त्या पत्रकाराला प्रश्न विचारल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे जन कुत्सितपणे हसले. प्रमोद महाजनांनी सुद्धा कुत्सितपणे उत्तर दिले. पण त्यांनी दिलेले हे उत्तर दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांचे हेडलाईन बनले होते (But the answer he gave became the headline of all the newspapers the next day).

ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रमोद महाजन यांच्यासह अख्खा भाजप पक्ष अडचणीत आला. बावळट वाटणाऱ्या एका पत्रकाराच्या मुर्ख प्रश्नाने भाजपला अडचणीत आणले होते. पत्रकाराचा प्रश्न काय होता, अन् महाजन यांनी त्याला काय उत्तर दिले होते, ते आपण पाहू.

‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही हिंदी चित्रपटातील कलाकारांना उतरवले होते. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारात मराठी कलाकारांना उतरवणार का ?’ असा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला होता.

भाजपने सरकारला ठणकावले, ‘ब्लॅकमेल’ करू नका

pune: BJP worker removes Modi bust from temple after criticism, NCP %E2%80%98disappointed%E2%80%99

मघाशी सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न मुर्खपणाचा आहे, असे तेथील तथाकथित मातब्बर पत्रकार आणि खुद्द प्रमोद महाजन यांनाही वाटले होते. त्यामुळे महाजन यांनीही प्रश्नाला गांभिर्याने घेतले नव्हते (Even Mahajan did not take the question seriously).

‘मराठी चित्रपट कुणीच पाहात नाही, मग निवडणुकीच्या प्रचारात मराठी कलाकारांना कोण पाहायला येणार ?’ असे प्रमोद महाजन बोलून गेले. त्यांचे हे विधान स्फोटक ठरले.

त्यावेळी वृत्तवाहिन्यांचा फार दबदबा नव्हता. मराठी वृत्तवाहिन्यांचा तर जन्मही झालेला नव्हता. त्यामुळे महाजन यांच्या विधानाचा स्फोट व्हायला दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांच्या, विशेषतः मराठी वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स महाजन यांची झोप उडवणाऱ्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टी पेटून उठली. तरूण कलाकारांपासून ते ज्येष्ठ मराठी कलावंतांपर्यंत सगळेजण पेटून उठले. दादासाहेब फाळकेंपासूनचा इतिहास सांगायला सुरूवात झाली. प्रमोद महाजन यांच्यावर केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण मराठी जनता संतापली होती. विरोधकांना आयतेच कोलित मिळाले. भाजप मात्र बॅकफूटला गेला.

Pramod Mahajan had spoken by mistake
प्रमोद महाजन

हे वादंग पेटले होते, तेव्हा ‘श्वास’ या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. ऑस्करमध्ये प्रदर्शन करण्यासाठी ‘श्वास’च्या निर्मात्यांकडे त्यावेळी पुरेसा पैसाही नव्हता. परंतु मराठी चित्रपटाची मजल ऑस्करपर्यंत गेल्याने अनेकांनी त्यासाठी देणग्या दिल्या होत्या. त्यावर्षी एकाही हिंदी चित्रपटाला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे महाजन यांच्याविरोधात मराठी लोकांमध्ये आगडोंब उसळला होता. जोरदार आंदोलन सुरू झाली.

प्रमोद महाजन यांनी मात्र आपली चूक नम्रपणे मान्य केली. एवढा मोठा नेता, पण त्यांनी आंदोलन चिरडण्यासाठी सीबीआय, पोलीस अशा संस्थांचा वापर केला नाही. बातम्या दाबण्यासाठी मीडियावर दबाव आणला नाही. संघोटे पत्रकार अशी संकल्पना त्यावेळी फारशी चलतीमध्ये नव्हती. चूक झाली असेल तर यथेच्छ झोडपणारे पत्रकार त्यावेळी आस्तित्वात होते (If there was a mistake, there would be journalists who would just throw it away).

प्रमोद महाजन हे हेकट नेते नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली चूक झाल्याची कबूली त्यांनी दिली. माझ्याकडून अनवधाने बोलून गेल्याचे ते म्हणाले. अन् माफी सुद्धा मागितली. एवढेच नव्हे तर, श्वास चित्रपटासाठी त्यांनी घसघशीत देणगी दिली. प्रमोद महाजन राजकीय नेता म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच त्यांचे मनसुद्धा मोठे होते, हे या उदाहरणातून दिसून येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी