33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeसंपादकीयQueen Elizabeth : पाणावलेल्या नेत्रांनी महाराणी एलिझाबेथ यांना भावपूर्ण निरोप

Queen Elizabeth : पाणावलेल्या नेत्रांनी महाराणी एलिझाबेथ यांना भावपूर्ण निरोप

महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) यांच्यावर आज शाही अंत्यसंस्कार करण्यास दुपारी 1 वाजून 14 मिनीटांनी सुरूवात झाली. त्यांची अंतयात्रा तोफगाडीतून काढण्यात आली

महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) यांच्यावर आज शाही अंत्यसंस्कार करण्यास दुपारी 1 वाजून 14 मिनीटांनी सुरूवात झाली. त्यांची अंतयात्रा तोफगाडीतून काढण्यात आली. यावेळी त्यांच्या जवळशाही ताज ठेवण्यात आले होते. तसेच सफेद गुलाब आणि लिलीच्या फुलांचे पुष्पचक्र देखील ठेवण्यात आले होते. लंडनच्या कानाकोपऱ्यातून राणीच्या अंतिम दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. वेस्टमिनीस्टमधून ही अंतयात्रा निघाली. रात्री 8.30 मिनीटांनी राणीचे एबी चर्चमध्ये दफन करण्यात येईल. हे चर्च बकिंमघनपासून 4 किमी दूर आहे. 1947 मध्ये याच चर्चमध्ये राणीचा व‍िवाह झाला होता. राणीच्या अंतिम संस्कारांसाठी 1500 सेनेचे जवान तैनात होते. संपूर्ण रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महाराणी एलिझाबेथ यांनी 8 सप्टेंबरमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. 11 दिवसानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंग्लंडच्या जगतात एका युगाचा अस्त झाला असुन, आता दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. वयाच्या 96 वर्षांपर्यंत राज्य करणारी ही राणी संपूर्ण जगात आश्चर्यांचा विषय आहे. एलिझाबेथ या शाही घराण्यात सर्वांत जास्त काळ राजगादीवर राहिलेल्या राणी आहेत. त्या दीर्घकाळ आजारी होत्या. त्यांना एपीसोडिक मोबिलिटी आजार होता. शिवाय त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती.  महाराणी एलिझाबेथ यांचे जिवन अतिश‍य रोमांचकारी आहे. महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 मध्ये लंडन शहरात झाला. त्यांचे नाव अलेक्झेंड्रा मेरी होते.

त्यांच्या जन्माच्यावेळी त्यांचे आजोबा जॉर्ज पंचम यांचे राज्य होते. त्यांच्या वडीलांचे नाव डयुक ऑफ अर्क होते. त्यांनाच पुढे जॉर्ज 6 या नावाने ओळखले जात होते. तर त्यांच्या आईचे नाव एंजेला मार्गारेट होते. लग्नानंतर त्यांचे नाव एलिझाबेथ ठेवण्यात आले. तर त्यांच्या बहिणीचे नाव मार्गारेट होते. एलिझाबेथ यांच्या पतीचे नाव फ‍िलिप्स होते. एलिझाबेथ यांना चार मुलं आहेत. राजकुमार एंड्रयू, चार्ल्स, ऐने आणि एडवर्ड तसेच त्यांना सुना असून नातवंड आणि पतवंड देखील आहेत. प्रिंस विल्यम, प्रिंस हॅरी, प्रिंस जेम्स हे त्यांचे नातू आहेत.

महाराणी एलिझाबेथ कधीच शाळेत गेल्या नाहीत. त्यांचे शिक्षण राजमहालात झाले. त्यांनी घरी राहून फ्रेंच आणि राजनैतिक शिक्षण घेतले. तसेच त्यांनी गाडी चालवणे आणि गाडी दुरुस्त करण्याचे प्रश‍िक्षण देखील घेतले. त्यांनी ट्रक चालवणे तसेच सर्व्हीसींग करणे देखील शिकून घेतले होते. त्यांना गाडी चालवण्यासाठी लायसन्सची गरज नव्हती. विना पासपोर्ट त्यांना अनेक देशांची यात्रा करण्याची परवानगी होती.

हे सुद्धा वाचा

Raj Thackeray : स्वतंत्र‍ व‍िदर्भाच्या मुद्यावर जनमत घ्या, राज ठाकरेंचा नागपुरकरांना सल्ला

Raj Thackeray : विलासरावांच्या दुर्लक्षामुळे बीएमडब्ल्यूचा प्रकल्प तामिळनाडूला गेला, आता फॉक्सॉन गुजरातला का गेला याची चौकशी करा- राज ठाकरे

Taiwan : सावधान ! ‘या’ देशाला पुन्हा त्सुनामीचा धोका

एलिझाबेथ यांच्या जन्मानंतर 10 वर्षांनी 1936 मध्ये त्यांचे काका महाराजा एडवर्ड आठ यांनी अमेरिकतील वॅलिस सिंपसन बरोबर विवाह करून राज सिंहासनाचा त्याग केला. हा एक ऐतिहास‍िक निर्णय होता. त्यामुळे त्यांचे वडील राजा बनले. एलिझाबेथ त्यावेळी 25 वर्षांच्या होत्या. किंग जॉर्ज 6 म्हणजेच त्यांच्या वडीलांचे 1952 मध्ये निधन झाल्यावर त्या गादीच्या वारसदार झाल्या. त्या इंग्लंड, युके, ऑस्ट्रेलिया, न्युजीलँड, कॅनडा इत्यादी देशांच्या महाराणी बनल्या. तब्बल 70 वर्षे त्यांनी राजउपभोग घेतला. त्यांचे राहणीमान लोकांना आकर्षीत करणारे होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी