31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमुंबईP. L. Deshpande : पु. ल. देशपांडे कला अकादमीतील असुविधा आणि ठेकेदाराच्या...

P. L. Deshpande : पु. ल. देशपांडे कला अकादमीतील असुविधा आणि ठेकेदाराच्या मक्तेदारीबद्दल सांस्कृतिक मंत्र्यांकडे तक्रार

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे (P. L. Deshpande) महाराष्ट्र कला अकादमीतील असुविधांसोबत येथील ठेकेदाराच्या मक्केदारीविरोधात लय भारी ने आवाज उठविला होता.

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे (P. L. Deshpande) महाराष्ट्र कला अकादमीतील असुविधांसोबत येथील ठेकेदाराच्या मक्तेदारीबद्दल लय भारी ने आवाज उठविला होता. याची दखल घेत काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने आंदोलनाचे पाऊल उचलत सांस्कृतिक मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला 20 वर्षे उलटूनही येथे पिण्याचा पाण्याचा एक नळ नाही. तरीही पिण्याच्या पाण्याचे बिल लाखों रुपये येत आहे. येथे तालीम वा कार्यक्रम करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांसाठी टेबल, खुर्च्या आणि पंख्याची सोय करण्यात आलेली नाही. येथील मुरलीधर बांदेकर नावाचा ठेकेदार स्वतःचा मनमानीचा कारभार करत आहे. त्याच्याकडून रंगकर्मीना सर्व काही वस्तू भाड्याने घ्याव्या लागतात. त्यात रंगकर्मीनी तालीम वा कार्यक्रम करण्यासाठी बाहेरून एखादी खुर्ची, टेबल वा साऊंड सिस्टीम सोबत लाईट्स, सेट आणि कार्यक्रमाचा बॅनर जरी आणला तरी रॉयल्टीच्या नावावर ठेकेदार बांदेकर पैसे वसूल करतो.

VIDEO : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीविरोधात काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे आंदोलन

P. L. Deshpande Kala Academy : पु. ल. देशपांडे कला अकादमीला मिळते लाखो रुपयांचे भाडे, तरी आहे सुविधांचा अभाव

P L Academy Problem : पु. ल. देशपांडे अकादमीत पिण्याच्या पाण्याचा नळ नाही, तरीही लाखोंची बिले!

याचा खुद्द अनुभव काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष अशोक झगडे यांना सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित कार्यक्रम दरम्यान आला होता. याबाबत त्यांनी येथील प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यात कहर म्हणजे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम करण्यासाठी मराठी कलाकारांना अर्ज करण्यास सांगितले होते. मात्र मराठी कलाकारांचे अर्ज आल्यावर त्यांना कार्यक्रम करण्यासाठी डावलून दिल्लीतील हिंदी कलाकारांना बोलविण्याचा घाट घालण्यात आला. याबाबतही काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने प्रकल्प संचालक रोकडे यांच्याकडे लेखी तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेले नाही. यासंबंधित लय भारीने वृत्त ही प्रकाशित केली होते.

दरम्यान, तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याने पावसाळी अधिवेशना दरम्यान काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागातर्फे आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. नुकतीच काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील असुविधांसोबत ठेकेदाराच्या मक्तेदारीबद्दल लेखी तक्रार केली आहे. यासंबंधीत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याचे झगडे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी