31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयलोकांच्या आग्रहाखातर राजीव गांधी पंतप्रधान झाले, अन् देशाला प्रगतीपथावर नेले

लोकांच्या आग्रहाखातर राजीव गांधी पंतप्रधान झाले, अन् देशाला प्रगतीपथावर नेले

रसिका जाधव : टीम लय भारी

राजीव गांधी यांचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला मुंबईत झाला. राजीव गांधींच्या आजींच्या नावावरुन त्यांचे नाव राजीव असे ठेवण्यात आले. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर  इ. स. १९४७  मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले (At the urging of the people, Rajiv Gandhi became the Prime Minister).

राजीव गांधींनी आपले बालपण आपल्या आजोबांसोबत तीन मूर्ती हाउसमध्ये घालवले, ते काही काळासाठी डेहराडूनच्या वेल्हम शाळेत गेले. परंतु त्यानंतर त्यांना हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या निवासी दून शाळेत भरती करण्यात आले. तेथे त्यांचे अनेक मित्र बनले. ज्यांच्यासोबत त्यांची आयुष्यभराची मैत्री झाली. शालेय शिक्षणानंतर राजीव गांधी केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात गेले. परंतु त्यानंतर त्यांनी लंडन स्थित इम्पिरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यास केला.

‘तो’ बॉम्बस्फोट म्हणजे राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? नाना पटोलेंचा गंभीर आरोप

सोनीया गांधींनी म्युकरमायकोसिस बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र

राजीव गांधी यांना राजकारणात करीअर करण्यामध्ये त्यांना रस नव्हता. राजीव गांधी यांच्याकडे तत्वज्ञान, राजकारण किंवा इतिहासाशी संबंधित पुस्तके नव्हती. तर त्यांच्याकडे विज्ञान व इंजिनीअरींगची बरीच पुस्तके होती. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आवडत असे. त्यांना छायाचित्रण व रेडिओ ऐकण्याचाही छंद होता. विमान उड्डाण आकाशात उडणे ही त्यांची सर्वात जास्त आवड होती. त्यामुळेच त्यांनी इंग्लंडहून घरी परतताना दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवले. लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले (On a daily basis, he became a domestic service pilot of Indian Airlines).

इ. स. १९८०  मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. परंतु १९८० मध्ये एका विमान अपघातात त्यांच्या भावाचा संजय गांधींच्या मृत्यूने सर्व परिस्थिती बदलून टाकली. राजीव गांधी यांच्यावर राजकारणात प्रवेश करण्याबाबत आणि आपल्या आईला राजकीय कामात मदत करण्यासाठी दबाव येऊ लागला. त्यांनतर अनेक बाह्य व अंतर्गत आव्हाने देखील समोर आली. आधी त्यांनी या दबावांना विरोध केला. राजीव व सोनिया गांधी या दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधींनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ. स. १९८१  मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले.

Rajiv Gandhi took the country forward
सोनीया गांधी आणि राजीव गांधी

प्रियांका गांधींची नरेंद्र मोदींवर लसीकरण मोहिमेवरून परखड शब्दांत टीका

India pays tribute to former PM Rajiv Gandhi on his 77th birth anniversary

३१ ऑक्टोंबर इ.स. १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने  आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. राजीव गांधी वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान बनलेले होते. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली.

राजीव गांधींनी १९८४ ते १९८९ या काळात पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयामुळे आजच्या भारताच्या विकासाची पायाभरणी झाल्याचे दिसून येते. देशात पिढी बदलाचे अग्रदूत राजीव गांधी यांना इतिहासातील सर्वाधिक जनादेश मिळाला होता. आपल्या मातोश्रींच्या हत्येच्या दुखातून सावरल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला मागील सात निवडणुकांच्या तुलनेत लोकप्रिय मते अधिक प्रमाणात मिळाली. पक्षाने ५०८ जागांपैकी ४०१ जागा मिळवून एक विक्रम केला.

Rajiv Gandhi took the country forward
राजीव गांधी

७० कोटी भारतीयांचा नेता म्हणून अशी शानदार सुरुवात कोणत्याही परिस्थितीत उल्लेखनीय मानली जाते. हे याकरिता देखील अद्भुत आहे की राजीव गांधी अशा राजकीय कुटुंबाशी संबंधित होते ज्यांच्या चार पिढ्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सेवा केली. तरीदेखील राजीव गांधी राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक नव्हते व त्यांनी राजकारणात उशिरा आगमन केले.

जगातील टॉप टेन विद्यापीठांमध्ये राजीव गांधी यांनी शिक्षण घेतले होते. त्यामुळे भविष्यात तंत्रज्ञान हेच सामान्य जनतेच्या प्रगतीचे साधन असेल हे त्यांनी वेळीच ओळखले. म्हणूनच पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राजीव गांधींनी दूरचित्रवाणी, टेलिफोन, संगणक असे आधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले. आज भारत आयटी क्षेत्रात जगात मातब्बर मानला जातो. त्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली होती (It was laid by Rajiv Gandhi).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी