34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयकहाणी आग्र्याच्या सुटकेत शिवरायांसाठी जीवाची बाजी लावलेल्या दोन शिलेदारांची

कहाणी आग्र्याच्या सुटकेत शिवरायांसाठी जीवाची बाजी लावलेल्या दोन शिलेदारांची

प्राची ओले : टीम लय भारी

मुंबई : राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पहिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पूर्ण केले. परंतु, ह्यात साथीला होते ते शिवरायांचे मावळे. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’. एवढे लक्षात ठेऊन या हजारो मावळ्यांनी शिवाजी महारांजावरून जीव ओवाळून टाकला होता. स्वतःच्या जीवाची बाजी लाऊन अनेक मावळ्यांनी महाराजांना संकटाच्या फुफाट्यातून सुखरूप बाहेर काढले (Two stonemasons who risked their lives for Shivaraya).

त्यातलेच एक होते हिराजी फर्जंद आणि मदारी मेहतर. औरंगजेब बादशहाने दगा करून शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले. शत्रूच्या या छावणीतून निसटण्यासाठी शिवाजी महाराजांनी युक्ती लावली. या कामात हिराजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांचे काम अत्यंत जोखमीचे होते. पण राजे सुखरूप आपल्या स्वराज्यात पोहचले पाहिजे हाच एक त्या मावळ्यांच्या मनी निश्चय होता.

गोष्ट ऐका शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीची !

छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमणकर्ते म्हणणं गोवा पर्यटन खात्याला भोवलं

राजांनी नियोजनाची आखणी केली. आजारी असल्याचे नाटक केले. तब्येतीस आराम मिळावा ह्यासाठी पूजा घातली, रयतेत मिठाई वाटली. मुघल सैनिक रोज ते मिठाईने भरेलेल पेठारे उघडुन बघत, एवढ्या मोठ्या प्रमाणात रोज मिठाईचे पेठारे बघून सैनिक देखील थकले होते. ह्याचाच फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांच्या समावेत औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटायचे, असे नियोजन केले होते. या नियोजनात हिराजी यांची मोठी जोखमीची जबाबदारी होती. त्यांना महाराज्यांच्या वेशात झोपून रहायचे होते (I wanted to sleep in the dress of a maharaja).

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिराजी आणि मदारी मेहतर तयार झाले. महाराज कसे चालतात, उठतात, बसतात, आजारपणात कसे कंतात, इत्यादी सर्व गोष्टी त्यांनी बारकाईने शिकून घेतल्या होत्या. महाराजांच्या सलामती पुढे आमचे मरण लय मोठे नाय, असे बोलून हे शुर लढवैये तयार झाले.

Two stonemasons who risked their lives for Shivaraya
हिराजी फर्जंद

हिरोजी यांना फार मोठा हुन्नार साधायचा होता. अगदी हातातल्या कड्या पासून ते राजांच्या कवडींच्या माळेसोबत हिरोजी महाराजांसारखे तयार झाले. मदारी मेहतर देखील सेवकाच्या भूमिकेत तयार झाले. राजांनी निघताना पुन्हा राजगडावर भेटू असा विश्वास दिला आणि ते रवाना झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सावरकर भाजपाला मान्य आहेत का?: सचिन सावंत

Shivaji Maharaj’s ‘Hindavi Swarajya’ Best Example Of Good Governance: PM

हिराजी हे त्यांच्या हातातील राजांची अंगठी आणि कडा दिसेल असे भिंतीकडे तोंड करून झोपले. त्यांच्यावर पहारेकऱ्यांची दाट नजर होती. चार प्रहर रात्र आणि तीन प्रहर दिवस हिराजी महाराजांच्या वेशभूषेत झोपून राहिले. मदारी मेहतर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. ते राजांच्या वेशात झोपलेल्या हिराजिंचे पाय चोळत. कोणी त्यांची विचारपूस करायला आले की त्यांना महाराजांची तब्येत बिघडलेली आहे, असे सांगत आणि कोणाला राजांना भेटू न्हवते देत. राजांनी आतापर्यंत लांबचा पल्ला गाटला असेल, अशी खात्री करून त्यांनी देखील त्यांचा मोर्चा हटवायचा ठरवले. शेवटी एक दिवस महाराजांची औषध मात्रा संपली आहे, ती आणायला जातो आहे असे सांगून ते दोघे देखील सैनिकांच्या बंदोबस्तातून निसटले.

अशाप्रकारे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि त्यांच्या शिलेदार मावळ्यांनी ‘शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ’ हे पटवून दिले. पुढे जाऊन हिराजी रावजी यांचा शिवाजी महाराजांनी गौरव केला (Going further, Shivaji Maharaj honored Hiraji Raoji).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी