31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयजागतिक वडापाव दिन : जाणून घ्या कसा तयार झाला पहिला वडापाव

जागतिक वडापाव दिन : जाणून घ्या कसा तयार झाला पहिला वडापाव

रसिका जाधव : टिम लय भारी

वडापावचा शोध सर्वात प्रथम मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. आजपासून ५५ वर्षाअगोदार १९६६ मध्ये वडापावचा अशोक वैद्य या व्यक्तीने दादरच्या रेल्वे स्टेशनवर वडापाव विकण्याला सुरुवात केली होती. त्यांनी सर्वात प्रथम वडापावचा स्टॉल लावला होता. त्यानंतरच तो सर्वत्र मुंबईचा वडापाव म्हणून प्रसिद्ध झाला (Vadapav is a favorite dish of Mumbai).

ती वेळ होती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या चळवळीची ! शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रांतिवादी विचारांचे वारे जोरात वाहू लागले होते. मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसाने  आपली कंबर कसून फक्त कोणाची  चाकरी न करता, स्वतःही स्वतंत्र व्यवसायांत  उतरले पाहिजे  असे बाळासाहेबांचे ठाम  मत होते ! मनाने शिवसैनिक असणारे अशोक वैद्य आपल्या धंद्यात काय नवीन सुधारणा करता येतील  या प्रयत्नात नेहमीच असत.  अशाच प्रयत्नात असताना आपल्या बाजूच्या गाड्यावर आम्लेट पाव विकणाऱ्या माणसाकडून प्रेरणा घेऊन त्यांनीही आपले खमंग वडे पावासोबत विकण्याचे ठरवले. महाराष्ट्रीयन  माणूस हा तिखट प्रेमी आहे. मग लसूण मिरची आणि खोबऱ्याची झणझणीत चटणी पावाला लावून, झाला ना ह्या वडापावचा जन्म, १९६६ मध्ये !

मुंबईला पुरापासून वाचविण्याची गरज, शिवसेना आमदाराने सुचविला भन्नाट उपाय

‘मुंबईचे लोकलप्रवाशी शिवपंख लावणार, अन् कामावर उडत उडत जाणार’, मनसेने सांगितले भाकीत

१९७० आणि १९८० च्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात अनेक कारखाने बंद झाले होते. तेव्हा तेथील हजारो मजुरांना कामाची कमतरता भासली होती, तेव्हा त्यापैकी अनेकांनी वडापावचे स्टॉल लावून आपल्या धंद्याला सुरुवात केली होती. यासाठी त्यांना शिवसेनेने हे काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले होते. जेव्हा शिवशेनेच्या बैठका होत होत्या तेव्हा तेथील लोकांना वडापावचा अल्पोआहार देण्यात येत असे (When Shiv Sena meetings were taking place, the people there were given a snack of Vadapav).

लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते, हजारो जणांचे पोट भरण्यासाठी वेळेवर कामावर पोचवण्याचे, स्वस्त प्रवासाचे साधन आणि कधी या लांबच्या प्रवासात, मुंबईच्या मुसळधार पावसात अडकून पडलेल्यांना किंवा नुसताच कधीतरी टाईमपास करताना, जिभेला आणि पोटाला तृप्त करणारा वडापाव हा सुद्धा कुठल्या लाईफलाईन पेक्षा कमी नाही.

Vadapav is a favorite dish of Mumbai
मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव

नारळी पौर्णिमेचे कोळी बांधवांसाठी असणारे महत्त्व

Vada Pav At Priyanka Chopra’s Restaurant Sona Wins Hearts In NYC

वडापाव म्हटले की, डोळ्यांसमोर उभी राहते, धडधडणारी लोकल, सीएसटी स्टेशनाच्या बाहेर लावलेल्या घडाळ्याच्या काट्यावर धावणारी माणसे, मध्यरात्री सुद्धा गाड्यावर पंप मारत पेटवलेल्या स्टोव्हवरील कढईत दणादणा उकळणाऱ्या तेलात तळलेले गरमागरम वडे चटकन वर्तमानपत्रात गुंडाळून खायला देणारी माणसे.

तेव्हा दक्षिण भारताची प्रसिध्द डिश उडुपी खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जायची पण जेव्हा वडापावची सुरुवात झाली तेव्हा वडापावने त्या डिशला सुध्दा मागे टाकले. देशाच्या प्रत्येक राज्यात आज मुंबईचा वडापाव म्हणून ही डिश प्रसिध्द झालेली आहे (Today, this dish is known as the Vadapav of Mumbai in every state of the country).

१७ व्या शतकात युरोपातील देशातून आलू आणि पाव हे खायचे पदार्थ आले होते. परंतु त्यांना योग्य प्रकारे भारतात बनविल्या गेल्या. सर्वात आधी वडापाव ही डिश आपल्या देशात बनविल्या गेली होती. आणि ह्यावर एक डॉक्युमेंटरी सुध्दा बनविल्या गेलेली आहे. त्यामध्ये दाखवले गेले आहे की वडापावला बनविण्याची आयडिया त्यांना कशी मिळाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी