28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाडांनी म्हाडाची ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर

जितेंद्र आव्हाडांनी म्हाडाची ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख केली जाहीर

टीम लय भारी

मुंबई: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8 हजार 205 सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी (ता.23) जाहीर केली आहे (Jitendra Awhad announces MHADA online application filling date).

आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास (म्हाडा)मंडळातर्फे 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तसेच यात त्यांनी वेळापत्रकही जाहीर केले आहे. 14 ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

डॉ. जितेंद्र आव्हाडांना बीडीडी चाळीतील महिलांनी बांधली राखी

डॉ. जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, तळीये गाव वसविण्याचे काम ‘म्हाडा’ करणार

सोडतीमध्ये समाविष्ठ एकूण सदनिकांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 70 टक्क, अल्प उत्पन्न गटासाठी 27 टक्के म्हणजेच 97 अत्यल्प व अल्प गटासाठी घरे उपलब्ध होतील.अर्जाची किंमत 560 रुपये असेल. अर्जासमवेत भरावयाची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी  ५ हजार रुपये,अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी 15 हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार रुपये इतकी असेल. प्रवर्ग निहाय उत्पन्न मर्यादा मासिक अत्यल्प उत्पन्न गटासाठी 25 हजार रुपये पर्यंत,अल्प उत्पन्न गटासाठी 25 ते 50 हजार रुपये पर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी 75 हजार रुपये पेक्षा जास्त असणार आहे. (Jitendra Awhad said the category wise income limit is up to Rs 25,000 per month for the lowest income group).

Jitendra Awhad announces MHADA online application date
उच्च उत्पन्न गटासाठी 75 हजार रुपये पेक्षा जास्त असणार

दुर्गंधी जाईल, इतिहास राहील (डॉ. जितेंद्र आव्हाड)

Thane: Jitendra Awhad urges TMC chief to conduct audit for illegal buildings

 संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत असून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सोडतीमध्ये अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने परतावा करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी