28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeसंपादकीयभाजपचे शहाणपण संकटकाळातही जाते कुठे ?

भाजपचे शहाणपण संकटकाळातही जाते कुठे ?

विकास लवांडे

प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश

पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर या चार महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय तिथे आमदार खासदार भाजपचेच आहेत. कोरोना संकटात वरील चारही ठिकाणी मनपा अयशस्वी ठरल्या आहेत. हे माझे निरीक्षण आहे. इथेच सर्वाधिक रुग्ण कसे काय? इथेच रुग्णांची गैरसोय आणि हेळसांड का होते आहे? मृतांची संख्या इथेच जास्त आहे. येथील मनपा कारभार अतिशय बेजबाबदार असल्याचे कोव्हीड योध्ये म्हणून कुणी कार्यरत असतील तर त्यांना लक्ष्यात येईल. कुणीही तपासायला हरकत नाही. बाकीच्या दिसून आंधळे आणि ऐकून बहिऱ्या असलेल्यांनी याबाबत राज्यसरकारवर बिनबुडाची निराधार चर्चा करून नमो नमो करू नये. कारण नमो नमो करत तुमच्या देशाचा ऑक्सिजन, तुमच्या देशाच्या कोव्हीड प्रतिबंधक लसी आणि रेमडिसिव्हर इंजेक्शन्स निर्यात केल्यामुळे समस्त भारतीयांचे आज जीव जात आहेत.

जनता तडफडत असतांना महाशय आपल्या मंत्र्यांसह ४ राज्यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. देशाचे आरोग्यमंत्री बेजबाबदार वक्तव्य करत राहिले पण महाराष्ट्रात फिरकले नाहीत जणू त्यांची काहीच जबाबदारी नाही. महाराष्ट्रावर महापूर असो की करोना, दुष्काळ असो की अतिवृष्टी अशी नैसर्गिक संकटे आली मात्र केंद्राची कसली ही मदत नाही की पीएम नमो साहेबांचे दौरे नाहीत. महाराष्ट्रात निवडणूका लागतील तेव्हा न चुकता २०/२५ सभा घेतील, आगामी विविध झेडपी आणि मनपा निवडणुकीत पूर्ण जातीने बुथपर्यंत लक्ष्य देतील. पण आज महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार दुष्टपणा करत असल्याचे उघड सत्य भक्त मान्य करणार नाहीत ते विषयांतर करून तिसरेच बोलतील.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजप राज्य सरकारवर टीका करत म्हणत होती की लॉकडाऊन नको पण आता खुद्द नमो पर्वा ‘मन की बात’ करत म्हणाले लॉक डाऊनला पर्याय नाही. राज्यातील सर्व मंदिर उघडावी म्हणून महाराष्ट्र भाजपने मध्यंतरी आंदोलन केले लोकभावना लोकश्रद्धांचा राजकीय फायदा घेण्याच्या नादात लोकांचे जीव जाऊ लागले याचे त्यांना भान राहिले नाही. त्यामुळे कुणाचा काय फायदा झाला त्यांनी सांगायला हवा. वरील ४ मनपामध्ये सत्ता हातात घेऊन सध्या सर्व नगरसेवक आणि तेथील आमदार खासदार तोंड लपवून बसले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस सर्टिफिकेटवर नमो साहेबांचा फोटो टाकून काय सिद्ध करत आहेत? आता लोक म्हणू लागले की डेथ सर्टीफिकेटवर सुद्धा नमो साहेबांचे फोटो टाकावेत.

महाराष्ट्र सरकारने कोव्हीड टेस्ट वाढवल्या कुठंही रुग्ण संख्या गुजरात, यूपी, बिहार प्रमाणे लपवली नाही हे जाणकारांना सांगायची गरज नसावी. केंद्र सरकार राज्याची आर्थिक आणि राजकीय कोंडी करत आहे. राज्याच्या  हक्काचे पैसे सुद्धा संकटसमयी देत नाहीत. महाराष्ट्र भाजप नेते मात्र उठसुठ राज्यपालांना दर आठवड्याला निवेदन देत आहेत राजभवन म्हणजे जणू भाजप कचेरी आहे की काय अशी शंका जनतेला येऊ लागली आहे.

उठसुठ पत्रकार परिषद घेऊन राज्यसरकारवर निराधार आरोप करून जनतेमध्ये संभ्रम करायचा हाच भाजपचा कार्यक्रम करत आहे. सार्वत्रिक महामारी संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संकटाचा सामना करण्याचा शहाणपणा भाजप दाखवू शकत नाही? मुह में राम और बगल मे छुरी? आता सुज्ञ जनतेला भाजपची कुटनीती आणि बेजबाबदार वर्तन लक्षात आले आहे. त्यांची जागा त्यांना जनता नक्की दाखवेल.

राम राम.!!

सर्वांनी काळजी घ्या..!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी