एज्युकेशन

‘एनसीईआरटी’च्या निषेधार्थ अंनिसचे ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ प्रबोधन अभियान


‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (एनसीईआरटी) ने काही दिवसांपूर्वी, मुघल साम्राज्याचा, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा काही भाग अभ्यासक्रमातून वगळला. त्यानंतर विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमातून डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत देखील अभ्यासक्रमातून वगळल्याने अनेक विज्ञाननिष्ठ, विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळल्याच्या एनसीआरटीच्या कृतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ प्रबोधन अभियान राबविणार आहे. अंनिस मार्फत डॉ. हमीद दाभोलकर मिलिंद देशमुख नंदिनी जाधव आणि श्रीपाल लालवाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे.

ह्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले आहे कि, मानवी जीवनाच्या वर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती हि मानवी जीवनाचा उगम कसा झाला यांची योग्य माहिती नसल्याने होतो. त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्प्पती मागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते. प्रत्यक्षात सहावी सातवीच्या विद्यार्थ्याला ह्या विषयी प्रश्न पडू लागतात त्यामुळे तेव्हा पासून टप्प्याटप्प्याने ह्या विषयी माहिती शालेय अभ्यास क्रमातून येणे आवश्यक आहे.

उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय पुस्तकांच्या मधून वगळल्यामुळे मुलांच्या मध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे, असे देखील या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. या मध्ये पुढे सांगितले आहे कि, भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांच्या मध्ये हा उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांती या विषयी विशेष कोर्स देखील शिकवले जातात अशा पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत हा दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्या मुळे जे विद्यार्थी दहावी नंतर विज्ञान ही शाखा घेणार नाहीत त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरतील अठराशे वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे त्याला महाराष्ट्र अनिस पाठींबा देत आहे असे देखील या पत्रात नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक प्रश्न

न्यायाधीशांनी वॉरंट काढण्याची तंबी देताच छगन भुजबळ झाले कोर्टात हजर

न्यायाधीशांनी वॉरंट काढण्याची तंबी देताच छगन भुजबळ झाले कोर्टात हजर

चला उत्क्रांती समजून घेवूया अभियान
१. उत्क्रांती विषयावर शालेय मुलांच्या साठी पुस्तिका प्रकाशन
२. विज्ञान शिक्षकांच्या साठी उत्क्रांती विषयावर कार्यशाळा
३. NCERT ला उक्रांती विषय शिक्षणत समाविष्ट करण्या साठी पत्र लिहिण्याची मोहीम
४. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे

टीम लय भारी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

12 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

12 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

13 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

13 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

15 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

16 hours ago