29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत...

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक प्रश्न आहे. यासंदर्भात सध्याच्या स्थितीत अधिक काहीही बोलणे योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, हा त्यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. यासंदर्भात सध्याच्या स्थितीत अधिक काहीही बोलणे योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सध्या बरेच मंथन चालले आहे. याबाबत नेमकी परिस्थिती काय आहे, ते सर्वांसमोर आल्यावरच बोलणे योग्य ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरे पाहता, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तांत्रिक मुद्दा आहे. पक्ष कोणत्या दिशेला जातोय ते माहिती नाही.

आम्ही घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहोत. हे काय होतंय, का होतंय, याबाबत सर्व परिस्थिती स्पष्ट झाल्यावर प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले. शरद पवार यांचे  पुस्तक मी वाचलेले नाही. मात्र, मलाही माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहायचे आहे. मी त्यामध्ये योग्य गोष्टी लिहिणार आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय ते मी माझ्या पुस्तकात लिहिणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी