29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमन्यायाधीशांनी वॉरंट काढण्याची तंबी देताच छगन भुजबळ झाले कोर्टात हजर

न्यायाधीशांनी वॉरंट काढण्याची तंबी देताच छगन भुजबळ झाले कोर्टात हजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर आज कोर्टात गैरहजर राहिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. असे असेल तर मला वॉरंट काढावं लागेल, अस न्यायाधीश म्हणाले. यानंतर काही वेळातच भुजबळ कोर्टात हजर झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात महाराष्ट्र घोटाळा प्रकरणी खटला सुरू आहे. याची नियमित सुनावणी होत असते. या भुजबळ आणि इतर काही जण आरोपी आहेत. त्यांना कोणतीही गैरहजर राहण्याची सवलत नाही. यानंतर ही अनेक आरोपी सुनावणीच्या वेळी गैरहजर राहत असतात. आज छगन भुजबळ ही सुनावणी साठी गैरहजर राहिले होते. कोर्टाची सुनावणी झाल्यावर जेव्हा भुजबळ यांच्या केसची सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी आरोपी कुठे आहे, अस विचारलं असता ते आले नाहीत. महत्वाच्या कामासाठी थांबले आहेत, भुजबळ यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले.

त्यावर न्यायमूर्ती राहुल रोकडे वैतागले, असे चालणार नाही. आरोपीने कोणत्या प्रकारचा सवलती साठी अर्ज केलेला नाही. त्यानंतर ही ते सुनावणीला गैरहजर कसे राहू शकतात, असा प्रश्न कोर्टाने वकिलाला विचारला. त्यानंतर भुजबळ पुढच्या सुनावणीला वेळेवर हजर राहतील अस ही भुजबळ यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले असता, न्यायमूर्ती यांनी नाराजी व्यक्त केली. जर असेल तर मला आरोपी विरोधात वॉरंट काढावं लागेल, अस न्यायधीश म्हणाले. यावेळी भुजबळ यांच्या वकिलाने थोडा वेळ मागितला आणि मग थोड्याच वेळात भुजबळ कोर्टात हजर झाले.

हे सुद्धा वाचा

मातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; अब्दुल सत्ताराच्या मानगुटीवर आता तुकाराम मुंढे !

सर्वोच्च न्यायालयानंतर उच्च न्यायालयातही नवाब मलिकांच्या पदरी निराशा

पवार साहेबांचे विचार घेऊन एकलव्यासारखं निष्ठेने काम करत राहू : प्रशांत विरकर

कोर्टात आल्यावर पवार साहेब यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत, त्या कार्यक्रमाला होतो. त्यामुळे उशीर झाला, अस त्यांनी सांगितलं. मुख्य म्हणजे ते हजर झाल्याबाबत कोर्टाने समाधान व्यक्त केलं. आणि वॉरंट काढायचं रद्द केलं. थोडा वेळ सुनावणी चालली, मग भुजबळ निघून गेले. आपण कोर्टात नियमित हजर राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी