31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनDhanraj Mane : उच्च शिक्षण संचालकांचा आडमुठेपणा, सरकारी आदेश धुडकावला!

Dhanraj Mane : उच्च शिक्षण संचालकांचा आडमुठेपणा, सरकारी आदेश धुडकावला!

सरकारने एक लेखी आदेश जारी केला होता. या आदेशाला धनराज माने यांनी भीक घातलेली नाही. माने यांनी या आदेशाला भीक घालावी म्हणून आता सरकारी यंत्रणेने पुन्हा आदेश जारी केला आहे. सरकारी आदेश पाळायचा असतो याचा साक्षात्कार आता तरी माने यांना होईल का, असा सवाल केला जात आहे.धनराज माने हे संचालक पदावर कार्यरत आहेत.

सरकारी पदावरील अधिकारी किती आडमुठे वागू शकतात, हे एका उदाहरणावरून समोर आले आहे. उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी आपल्या आडमुठेपणाचे जगजाहीर प्रदर्शन करण्याचे ठरविलेले दिसते. त्यांच्या संदर्भात सरकारने एक लेखी आदेश जारी केला होता. या आदेशाला धनराज माने यांनी भीक घातलेली नाही. माने यांनी या आदेशाला भीक घालावी म्हणून आता सरकारी यंत्रणेने पुन्हा आदेश जारी केला आहे. सरकारी आदेश पाळायचा असतो याचा साक्षात्कार आता तरी माने यांना होईल का, असा सवाल केला जात आहे.धनराज माने हे संचालक पदावर कार्यरत आहेत.

राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांवर माने यांचे नियंत्रण असते. विशेषत: अध्यापक व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पगार, नियुक्त्या, सरकारी महाविद्यालयांची अनुदाने असे विषय त्यांच्या अखत्यारित येतात. पैशाचा मामला त्यांच्या अधिकारात असल्याने या पदाला फार मोठे महत्व आहे.पण ही संवेदनशील व महत्वाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता माने यांच्याकडे नाही. याचे कारण म्हणजे माने यांची दृष्टी अधू झाली आहे. त्यांना अंधुक दिसते. त्यामुळे त्यांना समोरचा कागद वाचता येत नाही. धनादेशावर व महत्वाच्या कागदपत्रांवर चुकीच्या ठिकाणी ते स्वाक्षरी करतात.

Dhanraj Mane : उच्च शिक्षण संचालकांचा आडमुठेपणा, सरकारी आदेश धुडकावला!

सरकारच्या नियमानुसार वयाची पन्नासी ओलांडलेल्या व्यक्तीला वैद्यकीय क्षमता सिद्ध करावी लागते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची तसदी उच्च शिक्षण विभागाने घेतली नव्हती. दुसऱ्या बाजूला माने यांच्या अकार्यक्षमतेमुळे उच्च शिक्षण संचालनालयातील कारभाराच्या तीन तेरा वाजल्या आहेत. शिवाय माने यांच्या इतर भानगडींमुळे अध्यापक व अध्यापकेतर मंडळी त्रस्त आहेत. त्यामुळे माने यांच्या विरोधात आंदोलने सुद्धा झालेली आहेत. ‘लय भारी’ने सुद्धा सातत्याने बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने माने यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश जारी केला होता.

हे सुद्धा वाचा…

Education : चंद्रकांतदादा पाटलांना गरज ‘डोळस’ अधिकाऱ्याची !

Maharashtra Government : संतापजनक… राज्यातील 55 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना फुकटात पगार!

Aryan Khan : आर्यन खाने स्वत:ला सावरले, सोशल मीडियावर झाला सक्रीय

सरकारच्या या आदेशाचे पालन माने यांनी केले नाही. ते वैद्यकीय तपासणी मंडळासमोर हजरच राहिलेले नाहीत. त्यामुळे जे. जे. रूग्णालयाने माने यांना पत्र पाठविले आहे. तपासणीसाठी हजर राहिले नसल्याबद्दल या पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. येत्या 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या आदेशाचे तरी धनराज माने पालन करणार का असा सवाल उच्च शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी