30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
HomeमनोरंजनAryan Khan : आर्यन खाने स्वत:ला सावरले, सोशल मीडियावर झाला सक्रीय

Aryan Khan : आर्यन खाने स्वत:ला सावरले, सोशल मीडियावर झाला सक्रीय

सुप्रसिद्ध अभ‍िनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा लाडका मुलगा आर्यन खान सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

सुप्रसिद्ध अभ‍िनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा लाडका मुलगा आर्यन खान सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. ड्रग्स प्रकरणातून बाहेर आल्यानंतर ‍पहिल्यांदाच त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. काही दिवसांपूर्वी आर्यन खान हा वेब सीरीजमध्ये काम करणार असल्याची बातमी समोर आली हाेती. सोशल मीडियावर‍ म्हणजे इंस्टाग्रामवर त्याने आपला फोटो पोस्ट केला आहे. आता आर्यन खान आपल्या मार्गाने प्रवास करण्यासाठी तयार झाल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. त्याच्या या पोस्टवर त्याची आई गौरी खानसह अनेक सेलीब्रेटींनी कमेंट केल्या आहेत.

गौरी खानने प्रतिक्रीया देतांना ‘माय ब्वॉय’ असे म्हणत तीन वेळा लव लिहीले आहे. तसेच सुहाना खानने देखील आपल्या भावाला मदत केली आहे. तसेच महीप कपूर आणि सीमा सजदेह यांनी देखील त्याच्या पोस्टला प्रतिक्रीया दिल्या असून, त्याचे सोशल मीडियावर स्वागत केले आहे. तर त्याचे वडील शाहरुख खान यांनी देखील त्याच्या या नवीन जिवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शारुख खान आपल्या कमेंटमध्ये लिहीतात की, तु खूपच छान दिसत आहेस. लोकं म्हणतात, वडीलांमध्ये लपलेलं मुलामध्ये चमकत आहे. तसेही, काय तर तो ग्रे टी-शर्ट माझाच आहे…….

हे सुद्धा वाचा

University : महाराष्ट्र आणि अमेरिकेतील विद्यापीठे एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीच्या अध‍िकाऱ्यांची घेणार शाळा !

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा झंझावात आता उदय सामंत, रामदास कदमांच्या दारात!

आर्यन खान हा तरुण असून, देखील सोशल मीडियावर कमी प्रमाणात दिसतो. त्याने 9 वर्षांमध्ये केवळ 25 पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत. त्यामध्ये भाऊ बहीण तसेच मित्र मंडळींबरोबरचे फोटो आहेत. सोशल मीडियावर त्याचे 2.1 मिलीयन म्हणजे 21 लाख फॉलोअर्स आहेत. आर्यन खानच्या आयुष्यात ड्रग्स प्रकरणामुळे एक मोठे वादळ आले होते. तो आता त्यातून सावरत आहे. 202‍1 मध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने त्याला अटक केली होती. त्याच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्याला जेलमध्ये देखील जावे लागले होते.

या प्रकरणाने राजकीय वळण घेतले होते. ‍तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने आपली बहीण सुहाना आणि भाऊ अबराम यांच्या सोबतचा फोटो शेअर केला होता. त्याची बहीण सुहाना खान ही जोया अख्तर यांच्या एका चित्रपटात डेब्यू करत आहे. आर्यन देखील लवकरच चित्रपटात काम करणार असल्याचे संकेत मिळत आहे. कारण तो आता धक्क्यातून सावरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी