31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeराजकीयGoa Congress : गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी शपथ मोडली

Goa Congress : गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी शपथ मोडली

भाजपचे ऑपरेशन लोटस जोरदार सुरु आहे. देशातील प्रत्येक राज्यात भाजपला कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे. गोव्यातील काँग्रेसला (Goa Congress) पुन्हा एकदा गळती लागली असून, 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे ऑपरेशन लोटस जोरदार सुरु आहे. देशातील प्रत्येक राज्यात भाजपला कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे. गोव्यातील काँग्रेसला (Goa Congress) पुन्हा एकदा गळती लागली असून, 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. भाजपने काँग्रेसचा बिमोड करण्याचा वीडाच उचलला आहे, हे यावरुन अधोरेखीत झाले आहे. गोव्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. काँग्रेसच्या 11 आमदारांपैकी 8 आमदारांनी बुधवारी पक्षाला रामराम केला. गोव्यातील या आठ आमदारांना राहूल गांधी यांनी पक्ष न सोडण्याची शपथ दिली होती. ती शपथ त्यांनी मोडली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बुधवारी सकाळी सर्व आमदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे पोहोचले. त्यांनी विधासभा अध्यक्ष रमेश तावडकर यांच्याकडे पक्ष सोडत असल्याचे पत्र ‍दिले. हे सर्व आमदार भाजपमध्ये सामिल झाल्याची माहिती गोवा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तनवडे यांनी दिली. काँगेस सोडणाऱ्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो, देलिया लोबो, केदार नाईक, राजेश फलदेसाई, एलेक्सो स्कायरिया, संकल्प अमोलकर आणि रोडोल्फो फर्नांडिज यांचा समावेश आहे.

10 मार्च 2022 मध्ये काँग्रेसला 40 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या. मात्र 7 महिन्यात पक्षामध्ये फूट पडली. काँग्रेसने बाहेरु आलेल्या मायकल लोबो यांना विरोधीपक्ष नेता बनवले. लोबो हे निवडणुकीपूर्वी काही महिने आगोदर काँग्रेसमध्ये सामील झाले होते. तर‍ विरोधी पक्षाच्या शर्यतीमध्ये पहिल्यापासून दिगंबर काम होते. मात्र त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे ते नाराज होते.

हे सुद्धा वाचा

Aryan Khan : आर्यन खाने स्वत:ला सावरले, सोशल मीडियावर झाला सक्रीय

Maharashtra Government : संतापजनक… राज्यातील 55 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना फुकटात पगार!

Good Health : निरामय आरोग्यासाठी ‘लिंबू’ खाणे हितकारक

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी 4 आमदारांनी क्राँस वोटिंग केले. त्यावेळी काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठी काहीच प्रयत्न केले नहीत. यावर्षी कामत आणि लोबो यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला हाेता. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी 5 वर्षे पक्ष न सोडण्याची आमदारांना शपथ दिली होती.

काँग्रेसने त्यावेळी सर्व उमेदवारांची प्रतिज्ञा पत्रावर सही देखील घेतली होती. ही शपथ राहूल गांधी यांनी 4 फेब्रुवारी 2022 रोजी गोव्याची राजधानी पणजीमध्ये दिली होती. कारण 2019 मध्ये काँगेसचे 15 पैकी 10 आमदार हे भाजपमध्ये गेले होते. त्यामध्ये त्यावेळचे विरोधी पक्ष नेता चंद्रकांत कावलेकर यांचा देखील सहभाग होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या सर्व बंडखोर नेत्यांना भाजपमध्ये सामील करुन घेतले होते.आशा प्रकारे शपथ घेऊन देखील काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला रामराम केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी