31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशननंदुरबार नगरपालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल

नंदुरबार नगरपालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल

विद्यार्थ्यांनमध्ये शिक्षणाची आवड वाढावी म्हणून शिक्षक व सरकार वेगवेगळ्या शिक्षण पद्धती आजमावत असतात. एकविसाव्या शतकात शिक्षणाच्या पद्धती बदलत आहेत. सगळ काही डिजिटल होत आहे. याच बरोबर शिक्षणही डिजिटल होत आहे. नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, तसेच इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नंदुरबार नगरपालिकेने या शैक्षणिक वर्षात नगरपालिकेतील 12 शाळांमधील पाच शाळांचे वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत.

नंदुरबार पालिकेच्या शाळेत पालक विद्यार्थ्यांना पाठवत नसतात पण नगरपालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होणार आहे. नगरपलिकेच्या शाळांना डिजिटल बनवण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या सी एस आर फंडातून 40 लाखाची मदत मिळवली. या निधीतून नगरपालिकेच्या 16 शाळांमधून 5 शाळांमधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. एका खोलीला डिजिटल बनवण्यासाठी 8 लाख रुपये इतका खर्च झाला आहे.

हे सुद्धा वाचा:

पावसाच्या आगमानाने बळीराजा सुखावला, कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकरी सरसावला

ठाण्यातील अर्ध्या डझन प्रकल्पाचे रविवारी मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण….

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण; संत एकनाथ महाराजांची पालखी सोलपूरात

या डिजिटल वर्ग खोल्यांमध्ये 65 इंची डिजिटल टीव्ही, 10 बेंच, कार्पेट देण्यात आले आहे. शिक्षण पद्धती डिजिटल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले. पालिकेने येणाऱ्या वर्षात उर्वरित शाळा देखील डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक केले जात असून विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी