31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeएज्युकेशनराज्यातील सर्व शिक्षकांना आळीपाळीने सुटी, आदेश जारी

राज्यातील सर्व शिक्षकांना आळीपाळीने सुटी, आदेश जारी

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आळीपाळीने घरून काम करण्याची मूभा शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. गुरूवारी रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत शिक्षकांना आळीपाळीने (रोटेशन पद्धतीने) एक दिवस घरून, तर दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन काम करावे लागणार आहे.

राज्यातील सर्व शिक्षकांना आळीपाळीने सुटी, आदेश जारी

राज्यातील सर्व शिक्षकांना आळीपाळीने सुटी, आदेश जारी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने कामावर बोलाविण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारपासून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. परंतु शिक्षकांना सुटी देण्याचा अद्याप निर्णय झाला नव्हता. शिक्षकांनाही सुटी किंवा घरून काम करण्याची मूभा मिळावी अशी मागणी अनेक शिक्षक संघटना, तसेच शिक्षक आमदारांनी केली होती. ही मागणी शिक्षण विभागाने अंशतः मान्य केली आहे. शिक्षकांना सरसकट सुटी देण्याऐवजी आळीपाळीने सुटी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

ताज्या अपडेट मिळविण्यासाठी आमच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

राज्यातील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी देण्याचा निर्णय ‘सामान्य प्रशासन विभागा’ने घेतला होता. त्याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागानेही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आळीपाळीने कामावर येण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Breaking : ‘करोना’मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारी

‘करोना’बाबतच्या खोट्या मेसेजमुळे सरकारपुढे डोकेदुखी

Breaking : राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद, दहावी – बारावी वगळून सर्व परीक्षा रद्द

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी