31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeएज्युकेशनआयटीआयमध्ये नवा कोर्स, विद्यार्थ्याला मिळणार गलेलठ्ठ पगाराची नोकरी

आयटीआयमध्ये नवा कोर्स, विद्यार्थ्याला मिळणार गलेलठ्ठ पगाराची नोकरी

दहावी पास झाल्यावर आयटीआय कोर्स करायचा असेल तर पूर्वी टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन या पारंपरिक कोर्सेसशिवाय फारसा पर्याय नव्हता. मात्र, आता आयटीच्या दुनियेत आयटीआय संस्थांनी देखील कात टाकली असून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. हे कोर्सेस पूर्ण करणारे विद्यार्थी मोठमोठ्या मल्टीनॅशनल कपंन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी करीत आहेत.
तुम्हाला, हे वाचून आश्चर्य वाटले असेल ना ? पण होय, हे खरे आहे. “लिफ्ट अँड एस्केलेटर मेकॅनिक” आणि “इंटरनेट ऑफ थिंग्स टेक्निशियन” (स्मार्ट सिटी) या दोन अद्ययावत अभ्यासक्रमांनी विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  मुंबईतील जोगेश्वरी येथे असलेल्या “लालजी मेहरोत्रा अशासकीय आयटीआय संस्थेत हे दोन्ही अभ्यासक्रम शिकविले जात असून अशाप्रकारचे अद्ययावत अभ्यासक्रम राबविणारी संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव संस्था आहे.

‘लिफ्ट अँड एस्केलेटर मॅकेनिक ‘ हा आयटीआय अभ्यासक्रम २ वर्षे कालावधीचा असून त्यासाठी शैक्षणिक अहर्ता फक्त दहावी उत्तीर्ण आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना लिफ्ट म्हणजे, उद्वाहन आणि एस्केलेटर अर्थात सरकते जिने उभारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गगनचुंबी इमारती, हॉटेल्स, मॉल्स, मल्टीप्लेक्समध्ये लिफ्ट आणि एस्केलेटरचा मोठयाप्रमाणात वापर केला जातो.
लिफ्ट आणि एस्केलेटरची निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. या कंपन्यांना शोधूनही माणसे मिळत नाहीत. आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना कोन, ह्युंदाई, फोर्टीस, जॉन्सन यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये हमखास नोकरी मिळाली असल्याची माहिती या संस्थेचे विभागप्रमुख आर. व्ही. जोशी यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

काय आहे जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करायची तिबेटी परंपरा?

आयटीआयमध्ये लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिकचा कोर्स करा, मोठ्या पगाराची नोकरी लगेच मिळवा !

जेवणाचा डब्बा पडला 89 हजारांना, वीज बिलाच्या नावाखाली दीड लाखांना चुना

महाराष्ट्रात केवळ लालजी मेहरोत्रा आयटीआय या एकमेव संस्थेत लिफ्ट व एस्केलेटर मेकॅनिकचा कोर्स उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ३० हजार रुपये, असे गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे आहे. या अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी संस्थेच्या www .lmti .in या वेबसाईटवर अथवा ९२२४३२४८९३ आणि ९८१९३२७७७३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, घ्यावी, असे आवाहन जोशी यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी