31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रजेवणाचा डबा पडला 89 हजारांना, वीज बिलाच्या नावाखाली दीड लाखांना चुना

जेवणाचा डबा पडला 89 हजारांना, वीज बिलाच्या नावाखाली दीड लाखांना चुना

जमतारा (झारखंड) येथिल सायबर गँग कुप्रसिद्ध आहेत. या गॅंगने मुंबईतील दोन जणांना लुबाडले आहे. एकाला जेवणाचा डब्बा 89 हजार रुपयांना पडला तर दुसऱ्याला वीज बिल भरण्याच्या बहाण्याने दीड लाख रुपये लुटलेत. याबाबत मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना झारखंड येथून अटक करण्यात आली आहे.

गावदेवी पोलीस स्टेशन मध्ये सायबर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पहिला गुन्हा होता. 06/23 क्रमांकाचा तर दुसरा गुन्हा होता 21/23 क्रमांकाचा. पहिल्या गुन्ह्यात फिर्यादीने ऑनलाइन एका वेळच्या जेवणाच्या डब्याची ऑर्डर केली होती. फिर्यादीला डब्बा देण्याचा बहाणा करून त्यांच्या खात्यातून 89 हजार रुपये लुटण्यात आले होते.फिर्यादीला एकवेळचा डब्बा 89 हजार रुपयास पडला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

दुसरा गुन्हा ही अशाच पद्धतीने झाला होता. फिर्यादी यांचं लाईटच बिल भरायचं असल्याचं सांगून सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनीं ही गावदेवी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही
गुन्ह्याबाबत गावदेवी पोलिसांनी सायबर सेलची विशेष टीम बनवली होती.

सहायक पोलीस शिंदे, पोलीस उपनिरीक्षक उगले, होले यांची टीम होती. या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. तांत्रिक पद्धतीने तपास केला आता दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे झारखंड राज्यात आल्याचं उघडकीस आलं. यानंतर सहायक पोलीस निरिक्षक विलास शिंदे यांनी पाच जनांची टीम बनवली आणि झारखंड येथे 22 मार्च 2023 रोजी रवाना झाले.

ते आरोपीच्या मागावर होते.28 मार्च ला त्यांना पहिला आरोपी मिळाला. झारखंड राज्यातील डुमका जिल्ह्यातुन नागेश्वर ठाकूर, संतोषकुमार मंडल, रितेश कुमार मंडल यांना अटक केली. संतोष कुमार हा युट्युब वर व्हिडिओ बनवतो. दोन्ही आरोपिकडे चौकशी केली आता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांना तात्काळ मुंबईत आणण्यात आलं.

तर दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपींना ही पोलिसांनी अटक केली. झारखंड राज्यातील जिल्हा देवधर येथून आणखी तीन आरोपीना अटक केली. छोटे लाल मंडल, राजकुमार मंडल या दोघाना अटक केली. या पाच ही आरोपीना मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

दलाई लामा यांनी माफी मागितली

IIT बॉम्बे आत्महत्या प्रकरण: सुसाईड नोटमध्ये नाव असणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांला अटक

पॉइंटस् टेबल आयपीएल : RR अव्वल, KKR दुसऱ्या स्थानी

झारखंड मध्ये जमताडा गँग कुप्रसिद्ध आहे. तिकडे गावा गावात सायबर गुन्हेगार आहेत.ते झारखंड मध्ये बसून देशभरातील लोकांची सायबर गुन्ह्याच्या मार्फत फसवणूक करत असतात.ते एवढ्या डोंगराळ भागात राहत असल्याने त्यांच्या पर्यंत पोहचून अवघड असत.मात्र, गावदेवी पोलीस तिथे पोहचले आणि त्यांनी पाच आरोपीना अटक करून मुंबईत आणलं.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी