31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeजागतिककाय आहे जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करायची तिबेटी परंपरा?

काय आहे जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करायची तिबेटी परंपरा?

या प्रथेला मोठा इतिहास आहे. 'सेव्हन इयर्स इन तिबेट' या चित्रपटात, हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटच्या व्यक्तिरेखेला तिबेटी लोकांच्या एका गटाचा सामना करावा लागतो, जे सर्वजण एकाच वेळी त्याच्याकडे जीभ काढतात. तिबेटी परंपरेनुसार, एखाद्याची जीभ बाहेर काढणे हे आदर किंवा कराराचे लक्षण आहे.

काय आहे जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करायची तिबेटी परंपरा? ते आपण या पोस्टमधून जाणून घेणार आहोत. तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी नुकतीच माफी मागितली आहे. यासंबंधी खेद व्यक्त करताना दलाई लामा यांच्या हवाल्याने जारी केल्या गेलेल्या अधिकृत निवेदनात जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करण्याच्या तिबेटी परंपरेविषयी माहिती देण्यात आली आहे.

दलाई लामा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. व्हिडिओमध्ये दलाई लामा या लहानग्या मुलाला “जीभ चोखायला” सांगत असल्याचे दिसते. याविषयी वाद उत्पन्न झाल्यानंतर, सोमवारी दलाई लामा यांनी मुलाला ‘जीभ चोखायला’ सांगण्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. याशिवाय, त्यांनी मुलाची व त्याच्या कुटुंबाची माफी मागितली होती. विशेष म्हणजे, हे सर्व ज्या अनुयायांसमोर हे सारे घडले, त्यांना यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. कारण ती मुळातच तिबेटी परंपरा आहे. तरीही या व्हिडिओने जगभरात खळबळ उडवून दिली.

Seven Years In Tibet हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट 'सेव्हन इयर्स इन तिबेट' चित्रपट
हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट याच्या ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ चित्रपटाचे पोस्टर. हा चित्रपट जीभ बाहेर काढून आदर व्यक्त करण्याची परंपरा सांगतो. (क्रेडिट : गुगल)

या प्रथेला मोठा इतिहास आहे. ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ या चित्रपटात, हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटच्या व्यक्तिरेखेला तिबेटी लोकांच्या एका गटाचा सामना करावा लागतो, जे सर्वजण एकाच वेळी त्याच्याकडे पाहून जीभ काढतात.

तिबेटी परंपरेनुसार, एखाद्याची जीभ बाहेर काढणे हे आदर किंवा कराराचे लक्षण आहे आणि पारंपारिक तिबेटी संस्कृतीत अनेकदा अभिवादन म्हणून वापरले जाते. तिबेटी लोककथेनुसार, नवव्या शतकातील एका क्रूर तिबेटी राजाची जीभ काळी होती, म्हणून लोक त्याच्यासारखे नाहीत हे दाखवण्यासाठी त्यांची जीभ बाहेर काढतात.

World Cultural Greetings
ही तिबेटी मुले वाकुल्या दाखवत नाहीत, तर आदराने स्वागत करीत आहेत. (फोटो क्रेडिट : गुगल)

दलाई लामा यांच्यावतीने सोशल मीडियावर पसरवलेल्या चुकीच्या माहितीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले गेले की, अनेकदा जगभरात फिरणारे पवित्र साधू गर्भवती मातांना तिच्या बेबी बंपवर हात ठेवून आशीर्वाद देताना दिसतात. या प्रथा-परंपरा आहेत. त्यात गैर काहीच नाही.

Ali Landry's baby bump receives hands-on blessing from Pope Francis गरोदर स्त्रीच्या पोटावर (बेबी बंप) हात ठेवून आशीर्वाद देण्याची प्रथा काही देशात आहे. या फाइल फोटोत पोप एका सेलिब्रिटीच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देत आहेत.
गरोदर स्त्रीच्या पोटावर (बेबी बंप) हात ठेवून आशीर्वाद देण्याची प्रथा काही देशात आहे. या फाइल फोटोत पोप एका सेलिब्रिटीच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देत आहेत. (फोटो क्रेडिट : गुगल)

तिबेट राइट्स कलेक्टिव्ह या दिल्लीस्थित वकिली आणि धोरण संशोधन गटाच्या वेबसाइटवरील एका पोस्टनुसार, दलाई लामा यांनी अनेकदा भारतातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेत ‘करुणा’ या विषयाचा समावेश केला पाहिजे, असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना  धार्मिक विषय म्हणून नाही, परंतु आंतरिक शांती वाढवण्याचा आणि अधिक मानवी मूल्ये शिकण्याचा एक मार्ग म्हणून ते शिकवायला हवे. त्यातून प्रथा-परंपरा जपल्या जातील, देशो-देशीच्या संस्कृती टिकून राहतील.

 

 

"Sticking your tongue out at someone in Tibet, is actually a sign of respect. Origins are mixed: A 9th century Tibetan king, Lang Darma, known for his cruelty, had a black tongue. Buddhists, Tibetans believe in reincarnation, and they feared that this king would be reincarnated. Tibetans have greeted one another by sticking out their tongues demonstrating that they do not have black tongues, that they are not guilty of evil deeds, that they are not incarnations of the malevolent king." Bizarre International Greetings You Will Love To Try Tibet

TIBET China Old Tuck's Postcard Tibetan Salutation Tongues Out Chakzal ...
फोटो क्रेडीटस : गुगल

2019 मध्ये प्रकाशित, दलाई लामा यांचे ‘सीड्स ऑफ कंपॅशन: लेझन्स फ्रॉम द लाइफ’ हे मुलांचे चित्र पुस्तक (फोटोबुक) प्रेम आणि करुणेचे धडे देते. स्वतःच्या बालपणीच्या कथांद्वारे आईबद्दल, पहिल्या शिक्षिकेबद्दल दलाई लामा यांनी या पुस्तकात भावना मांडल्या आहेत. मानवाला सुखी व्हायचे असेल तर शिक्षणाला जिद्दीची जोड दिली पाहिजे, असे दलाई लामा यांचे ठाम मत आहे. शिक्षण फक्त पुस्तकी आधुनिक नव्हे तर पारंपारिक, संस्कृतीचेही हवे. दलाई लामा आणि आर्चबिशप डेसमंड टुटू यांच्या बालपणीच्या कथांचे दुसरे पुस्तक 2022 मध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यात तरुण वाचकांना कठीण काळातही आनंद कसा मिळवायचा, यांचे मार्गदर्शन केले गेले आहे.

 

हे सुद्धा वाचा : 

दलाई लामा यांनी माफी मागितली

अरेरे, आधी किस नंतर नको ते दलाई लामांनी हे काय केले !

मुस्लीम बांधव मोहरम  का साजरा करतात ? जाणून घ्या कारण

रँडम हाऊस चिल्ड्रेन बुक्सने ‘द बुक ऑफ जॉय’ या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलरचे फोटोबुकात रूपांतरित केले. ‘द लिटल बुक ऑफ जॉय’ मध्ये, दोन अध्यात्मिक गुरु, सहयोगी रॅचेल न्यूमन आणि डग्लस अब्राम्स संध्या गोष्टी सांगितल्या आहेत. न्यूयॉर्क टाईम्सचे चित्रकार राफेल लोपेझ यांनी चित्रे व कथा जिवंत केली. प्रत्येक मुलाने आनंद कसं वाढवावा, जगासोबत तो शेअर करून कसा वाढवू शकतात, यांचे धडे हे पुस्तक देते. हे सारे पारंपरिक बौद्ध संस्कृती आणि परंपरेत सांगितले गेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी