33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको; माजी आमदार प्रकाश शेंडगेंची मागणी

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको; माजी आमदार प्रकाश शेंडगेंची मागणी

टीम लय भारी
मुंबई: देशात ओमायक्रॉनचा संकट वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अलहाबाद उच्च न्यायालयाने यूपीसारख्या राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या आहे. महाराष्ट्र शासनाने उच्चन्यायालयात धाव घ्यावी. ओबीसी आरक्षणा विरहीत निवडणुका होणार आहेत, त्या पुढे ढकलण्यासाठी अर्ज करावा. ही चांगली संधी आहे. मध्यंतरीच्या काळात एम्पेरियल डाटा गोळा करता येईल. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण पुर्नेस्थापीत होईल. अशी मागणी माजी आमदार ओबीसी जनमोर्चोचे नेते प्रकाश शेंडगे यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे.( election will not happen, without obc reservation)

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको त्या पुढे ढकलण्यासाठी सरकारने साथीच्या रोगाचा कायदा वापरावा. अशीही मागणी प्रकाश शेंडगे यांनी अशीही मागणी केली आहे. राज्य विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. हिवाळी अधिवेश 28 तारखेला संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर अशा मागणी आहे. 28 ऐवजी 29 ला संपवावा. 29 तारखेला ओबीसीचे आरक्षण टिकवण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावा. सर्व आमदारांची मते जाणून घ्यावी,सर्व सरकार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी चर्चा करुन आरक्षण कसा पुर्नेस्थापीत होऊल याबाबत निर्णय घ्यावा. आरोप प्रत्यारोप करुन वेळ वाया घालवू नये. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन घेऊ शकतात. मग ओबीसी आरक्षणासाठी का घेऊ शकत नाही? माझी सरकारला विरोधी पक्षाला दोघांनाही विनंती आहे. विशेष अधिवेशन घेऊन ओबीसी समाजाला न्याय द्यावा.

नाना पटोले गरजले, OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात निवडणुका घेण्यास केला विरोध

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचे OBC आरक्षणाबाबत एकमत

प्रकाश शेंडगे यांनी काही दिवसांपूर्वीच ‘राष्ट्रवादी’च्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. राज्यातील ३४० ओबीसी, भटक्‍या समाजांच्या  सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचे नेतृत्व करायचे असल्याने निर्णय घेतला आहे.

प्रकाश शेंडगे हे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र आहेत. भाजपमध्ये असताना ते जतचे आमदार राहिले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदार असताना त्यांना उमेदवारी नाकारली. नाराज  होऊन ते राष्ट्रवादीत दाखल झाले. जतमध्ये लढलेही. त्यात त्यांचा पराभव झाला. सन २०१९ च्या  निवडणुकीत लढण्याची त्यांनी घोषणाही केली. मात्र, काल मुंबईत आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमावेळी राज्यातील ३४० जाती-जमातींच्या नेत्यांनी सामाजिक न्याय व आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करण्याची गळ घातल्याने निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण दिले जात असेल तर ते आम्ही कदापीही मान्य करणार नाही- शेंडगे

High Court: No OBC quota in Odisha panchayat polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी