31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडे इन ऍक्शन मोड! विधानपरिषदेने पुन्हा अनुभवले जुने धनंजय मुंडे!

धनंजय मुंडे इन ऍक्शन मोड! विधानपरिषदेने पुन्हा अनुभवले जुने धनंजय मुंडे!

टीम लय भारी

मुंबई (दि. 24) —- : जवळपास दोन वर्षांनी आज पुन्हा एकदा विधानपरिषद दणाणून गेली ती याच  सभागृहाच्या माजी विरोधी पक्ष नेत्याच्या एका दणकेबाज भाषणाने.  यावेळी ते विरोधी पक्षनेते नव्हते तर सरकारच्या वतीने बाजू मांडत होते तरीही आकडेवारीच्या जंजाळात न अडकता राजकीय टोलेबाजी करत विरोधकांच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवत सरकारची भक्कम बाजू मांडली. हा नेता म्हणजे कोण तर धनंजय मुंडे.(Dhananjay Munde in action mode!)

निम्मित होते ते विधान परिषदेत आज नियम 260 अन्वये विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रस्तावावर सरकारच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत बाजू मांडली ते . 26 मिनिटांच्या भाषणातून आज धनंजय मुंडे हे पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आल्याचे पाहायला मिळाले

अजित पवारांची एसटी कर्मचाऱ्यांना विनंती…

Ajit Pawar : BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

खरे तर या प्रस्तावात जवळपास 17 विभाग असल्याने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित उत्तर देणे  किंवा ज्या 17 विभागाची चर्चा आहे त्यापैकी एखाद्या मंत्र्याने उत्तर देणे अपेक्षित असताना उत्तर देण्याची जबाबदारी  आली ती धनंजय मुंडे यांच्यावर ही संधी सोडतील ते धनंजय मुंडे कसले

सरकारच्या वतीने आपल्या खात्याशी काहीही संबंध नसलेल्या सतरा विषयांवर जोरदार बॅटिंग करत त्यांनी विधानपरिषद दणाणून सोडली.

शाळा सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Opposition cannot be limited to UPA; need broader front with collective leadership, says NCP

मागील सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी व महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी यापासून ते अगदी ओबीसी आरक्षणाची पाळेमुळे आदी सर्वच मुद्द्यांवर विरोधकांनी केलेले आरोप धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीतून खोडून काढले. त्यामुळे विरोधीपक्षनेते सभागृहात अत्यंत अभ्यासपूर्ण व आक्रमक भाषण करणारे धनंजय मुंडे आज विधानपरिषदेला पुन्हा अनुभवायला मिळाले!

राज्यात सहकार क्षेत्रात केले जाणारे कामकाज व धोरण पाहून व त्याचा आदर्श घेऊन केंद्र सरकारने सहकार विभाग सुरू केला. राज्यात नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा केंद्र सरकारचा एकही माणूस साधी पाहणी करायला देखील महाराष्ट्रात फिरकला नाही, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकरी गाडीखाली चिरडून मारले; यावर विरोधक गप्प राहतात पण राज्य सरकारच्या मात्र चुका शोधण्यात धन्यता मानतात, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मागील व सध्याच्या सरकारमधील कार्यपद्धतीमधील फरकाची सभागृहाला  जाणीव करून दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात अनेक आव्हाने पेलत सरकार उत्तम कामगिरी करत आहे, संकटाना धैर्याने तोंड देत विकासाची वाट धरत आहे, मात्र विरोधक चुका काढण्यात व्यस्त आहेत; असे म्हणतच धनंजय मुंडे यांनी “उमर बिता दी औरो के नूक्स निकालते निकालते, अगर इतना ही खुद को तराशा होता तो फरिष्ते बन जाते” या शायरीच्या माध्यमातून विरोधकांना आरसा दाखवत महाविकास आघाडी सरकार मजबूत असून, कार्यकाळ निर्विघ्नपणे पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी