30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमनोरंजनActress Samantha Ruth Prabhu : अभ‍िनेत्री सामंथा रुथ प्रभु घेतेय परदेशात उपचार

Actress Samantha Ruth Prabhu : अभ‍िनेत्री सामंथा रुथ प्रभु घेतेय परदेशात उपचार

गंभीर शारीरिक समस्या न‍िर्माण झाल्याने ‘पुष्पा’ फेम अभ‍िनेत्री सामंथा रुथ प्रभु (Actress Samantha Ruth Prabhu) ही सोशल मीडियापासून दूर गेली आहे. ‘ऊं अंटावा’ हे पुष्पा द राइज चित्रपटातले गाणे लोकप्रिय करणारी अभ‍िनेत्री सोशल मीडियावर दिसत नसल्याने चाहत्यांना प्रश्न पडला होता. तिचे चाहते अस्वस्थ झाले होते. अखेर त्यांना प्रश्नाचे उत्तर मिळाले. तिची तब्बेत ठिक नसल्याने ती उपचार घेत आहे. तिला आरामाची गरज आहे. सामंथा रुथ प्रभु ही दाक्षिणात्य अभ‍िनेत्री असून, तिचे उत्तर भारतात देखील खूप चाहते आहेत. तिचा हिंदी भाषेतला ‘बेसब्री’ हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

तिने काही चित्रपटांचे चित्रीकरण थांबवले आहे. कारण ती सद्या यूएसएमध्ये उपचार घेत आहे. तिला त्त्वचेशी संबंधीत आजार झाला आहे. त्या आजाराचे नाव ‘पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन’ असे आहे. हा आजार जास्त काळ उन्हात गेल्याने होताे. हा आजार फार क्वचीत आढळतो. सूर्याच्या उजेडात गेल्यानंतर संपूर्ण शरीराला खाज येते. त्यानंतर शरीरावर डाग पडतात. पुरळ उठते. तो भाग दुखू लागतो. त्यामुळेच तिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सामंथाने ‘खुशी’ चित्रपटाचे चित्र‍िकरण देखील पुढे ढकलले आहे. ‘खुशी’ चित्रपटामध्ये ती विजय देवरकोंडाबरोबर काम करणार आहे.

ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. मात्र बऱ्याच दिवसांपासून ती सोशल मीडियावर दिसली नाही. त्यामुळे तिचे चाहते हैराण झाले होते. 31 जुलैला तिने आपले फोटो शेअर केले होते. त्यानंतर ती सोशल मीडियावर फारशी कोणाला दिसली नाही. तिने यशोदा चित्रपटाचा टीजर शेअर केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर कोणतेच अपडेट मिळाले नव्हते. अखेर तिच्या व‍िषयी माहिती मिळाल्याने चाहत्यांना बरे वाटले आहे.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar : अजित पवार आरोप करणाऱ्यांवर चांगलेच संतापले, म्हणाले होऊ द्या…..

Narayan Rane :सीआरझेड उल्लंघन प्रकरणी नारायण राणेंचा बंगला तोडणार, 10 लाखांचा दंडही दयावा लागणार

Kuno National Park: मोदींनी चित्ते सोडलेल्या कुनो राष्ट्रीय उदयानाच्या जवळील भागात कुपोषण, गरीबीची भीषण समस्या

जाणून घेऊ या सामंथा विषयी :

सामंथा रुथ प्रभु हिचा जन्म 28 एप्रिल 1987 मध्ये झाला. ती तेलगु आणि तामिळ अभ‍िनेत्री आहे. तसेच ती मॉडेल देखील आहे. ती चेन्नईमध्ये लहानाची मोठी झाली. त‍िने मॉडेलिंगला सुरूवात केली. तिचा विवाह अक्किनेनी नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य बरोबर झाला होता. काही कारणांनी त्यांनी अक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट घेतला.

तिला ‘ये माया चेसावेजेसी थेकेकुटटू’ साठी सर्वश्रेष्ठ नवोदित अभ‍िनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्याच वर्षी तिला सर्वश्रेष्ठ तामिळ अभ‍िनेत्रीचा फ‍िल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. तिने मॉस्कोइन कवेरी, एक दीवाना था, जबरदस्त, रमैया वस्तावैया, अल्लुडु सीनू ,अंजान इत्यादी तामिळ चित्रपटात काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी