29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
HomeराजकीयAjit Pawar : अजित पवार आरोप करणाऱ्यांवर चांगलेच संतापले, म्हणाले होऊ द्या.....

Ajit Pawar : अजित पवार आरोप करणाऱ्यांवर चांगलेच संतापले, म्हणाले होऊ द्या…..

विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेदांता फोक्सॉन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणाची तपास यंत्रणांकडून चौकशी करुन खात्री करुन घ्या असे खुले आव्हानच त्यांनी दिले आहे. तपास यंत्रणांना कामाला लावून या प्रकरणाची चौकशी करा. तर होऊ द्या दुध का दुध, पानी का पानी.... असे म्हणत अजित पवार रणांगणात उतरले आहेत.

विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेदांता फोक्सॉन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणाची तपास यंत्रणांकडून चौकशी करुन खात्री करुन घ्या असे खुले आव्हानच त्यांनी दिले आहे. तपास यंत्रणांना कामाला लावून या प्रकरणाची चौकशी करा. तर होऊ द्या दुध का दुध, पानी का पानी…. असे म्हणत अजित पवार रणांगणात उतरले आहेत. अजित पवार यांनी आज सांगितले की, काहीजणांनी अफवा उठवली आहे. महाव‍िकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नाकारण्यात आला किंवा पैशांची मागणी केली असेल असे आरोप भाजपकडून करण्यात आले होते.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे लाखो तरुणांचे रोजगार बुडाले आहेत. या संदर्भात महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले जात आहे. त्यांना आज विरोधी पक्ष नेते आजित पवार यांची प्रत्युउत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहेत. ते जाणार असतील तर त्यांनी वेदांता फॉक्सॉन प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. हा प्रकल्प राज्यात आला तर लाखो तरुण तरुणींना रोजगार मिळणार आहे. फारशी माहिती नसलेल्या लोकांनी वेगळया अफवा उठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

तर काल नागपूरला वेदांत फॉक्सॉन प्रकल्पावरुन कोणी किती पैसे मागितले….. असे संशयास्पद विधान करुन राज ठाकरे यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. कारण त्यांचा महाविकास आघाडीला कडवा विरोध आहे. अजित पवार असेही म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने असे प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मध्येच बंड झाले आणि सरकार कोसळले. काही पक्षातले लोकं म्हणतात की, वेगळी मागणी झाली. मी उपमुख्यमंत्री होतो. तेव्हा असे काहीही झालेले नाही. उगाच संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर कोणाला असे वाटत असेल, तर त्यांनी केंद्र-राज्य सरकारच्या हातात असलेल्या महत्त्वाच्या तपास यंत्रणांकडून चौकशी करावी. म्हणजे दुध का दुध, पानी का पानी होईल.

हे सुद्धा वाचा

Narayan Rane :सीआरझेड उल्लंघन प्रकरणी नारायण राणेंचा बंगला तोडणार, 10 लाखांचा दंडही दयावा लागणार

Captain Amarinder Singh : पक्ष बदलू अशी ओळख असलेल्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टनअमरिंदर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

Queen Elizabeth : पाणावलेल्या नेत्रांनी महाराणी एलिझाबेथ यांना भावपूर्ण निरोप

तसेच 15 जुलैला उच्चाधिकार सामितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत वेदांत प्रक्लपाचा विषय चर्चेला आला होता. म्हणजेच आमचे सरकार गेल्यानंतर ही बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सरकारच्या समितीने यावर निर्णय घ्यायला पाहिजे होता. परंतु तो त्यांनी घेतला नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता फॉक्सॉन प्रकल्प नाकारण्यात आला. हे आरोप साफ चुकीचे आहेत असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी