30 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरमनोरंजननयनताराने चाहत्यांसाठी आणली आहे गोड बातमी...

नयनताराने चाहत्यांसाठी आणली आहे गोड बातमी…

अभिनेत्री नयनताराने अखेरीस जवान चित्रपटाच्या ट्रेलरच्या दिवशी इंस्टाग्रामवर आगमन केले. नयनतारा तामिळ भाषिक चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जवान चित्रपटातून नयनतारा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सिनेमाच्या ट्रेलरच्या दिवशी तीने इंस्टाग्राम अकाउंटवर जवानचा ट्रेलर पोस्ट करत आपलं अधिकृत अकाउंट सुरु केलं.

आपल्या अकाउंटवर जवानचा ट्रेलर पोस्ट करत माझ्या आवडत्या शाहरुखसोबत माझा पाहिला चित्रपट अशी केप्शन लिहिली. नयनताराला काही तासातच 89 हजारहून अधिक फॉलोवर्स मिळाले. तिनं नवरा विघ्नेश, जवान चित्रपटाचा संगीतकार अनिरुद्ध आणि शाहरुखला फॉलो केलं. मिशेल ओबामा आणि जेनीफर लॉप्सलाही नयनतारा इंस्टाग्रामवर फॉलो करतेय. पहिल्याच दिवशी नयनतारानं जवानच्या हिंदी, तेलूगू आणि तामिळ भाषेतील ट्रेलर पोस्ट केले.

हे सुद्धा वाचा 
भारतीय रेल्वेच्या 105 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याकडे अध्यक्षपद
राहुल गांधींनी पुन्हा दांडपट्टा फिरवला !
गोपीचंद पडळकर-अनिल बाबर वादात उदय सामंत यांची उडी

नयनतारानं आपली जुळी मुलं उयीर आणि उलगसोबत फोटो पोस्ट करत त्यांचा चेहरा सर्वांसमोर आणला. आमचे उयीर आणि उलग अशी केप्शन दिली. तिच्या फोटोला अभिनेत्री रकुलप्रीतनं लाईक केलं. आपल्या मुलांना अनोख्या अंदाजात चष्मा लावून स्वेग दाखवत नयनतारानं अखेरीस व्हिडिओही शेअर केला. नयनतारा बुधवारी चेन्नईतील जवानच्या प्रमोशनला गैरहजर राहिली. सिनेमा प्रदर्शित व्हायला केवळ आठवडा शिल्लक असताना नयनतारा प्रमोशनमध्ये सहभाग घेणार का, याबाबत जवानच्या टीमकडून अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी