30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमनोरंजनराणादाचा शिंदे गटात प्रवेश, अनेक मराठी कलाकारही उपस्थित

राणादाचा शिंदे गटात प्रवेश, अनेक मराठी कलाकारही उपस्थित

महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अनेक जण शिंदे फडणवीसांच्या गटात प्रवेश करताना दिसत आहे. अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेले आमदार हे शिंदे फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली आहे. अभिनेता हार्दिक जोशी आणि अन्य मराठी कलाकारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव चित्रपट सेनेच्या लोगोचं अनावरण केलं आहे.

काल गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यात आनंदाश्रम येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी काही प्रसिद्ध मराठी कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला असून शिव चित्रपटसेनेच्या लोगोचं अनावरण केले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील हार्दिक जोशी, आदिती सारंगधर, माधव देवचके, अमोल नाईक, प्रतीक पाटील हे कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करुन त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी शिवसेना ही कामयच मराठी कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभी असून चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि काम करणारे तंत्रज्ञ यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून, चित्रपट सृष्टीतील कामगार, तंत्रज्ञ, यांचेही प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली. हार्दिक जोशी म्हणाला, आजवर प्रेक्षकांसाठी काम केलं आहे. आता पडद्यामागून काम करणाऱ्या कलाकारांसाठी काम करायची इच्छा आहे. आता राजकारणात प्रवेश केल्याने ते काम करण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचं राजकारण नसणारी ही संघटना आहे. त्यामुळे आम्ही सर्व कलाकार एकत्र येऊन मनोरंजन सृष्टीतील जे संपूर्ण युनिट आहे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत.

हे सुध्दा वाचा:

शरद पवारांच्या आडून आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला अजित पवारांचा आक्षेप

9 आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली – जयंत पाटील

राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे! प्रितीसंगमावर जाऊन फुंकले लढ्याचे रणशिंग

आदिती सारंगधर म्हणाली की शिंदे साहेब हे एकच नेते असे आहेत जे कधीही सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकणारे आहेत. त्यामुळे आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलारची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यपदी राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षिरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी