34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeमनोरंजनJacqueline Fernandez : जामीन मागण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट वकिलांच्या कपड्यात पोहोचली कोर्टात

Jacqueline Fernandez : जामीन मागण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट वकिलांच्या कपड्यात पोहोचली कोर्टात

पूर्ण प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसने कोर्टात यायच्यावेळी घातलेल्या वकिलांच्या ड्रेसवरून चर्चांना उधानं आलं आहे. विशेष म्हणजे तिच्यावर आरोपत्र दाखल असून जामीन मंजूर करण्यात आलेला नसताना ती इतक्या बेधडकपणे थेट वकिलांच्या कपड्यांत कोर्टात आली यावरून नेटकऱ्यांनी जॅकलिनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी (26 सप्टेंबर) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला. जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयाने समन्स बजावले होते. यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर ईडीकडून उत्तर मागितले आहे. तोपर्यंत त्यांचा नियमित जामीन न्यायालयात प्रलंबित आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाच्या विनंतीवरून न्यायालयाने जॅकलिनला 50 हजार रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला.

200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख 22 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. सोमवारीा अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आपल्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी वकिलाच्या वेशात पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. या प्रकरणात आरोपी पिंकी इराणीही पटियाला हाऊस कोर्टात हजर होती. पिंकी इराणी हिला यापूर्वीच जामीन मिळाला आहे. सोमवारी जॅकलिन फर्नांडिसला आरोपपत्राची प्रत देण्यात आली. पटियाला हाऊस कोर्टात 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता जॅकलिन फर्नांडिसच्या खटल्याची सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा…

T20I IND vs AUS : विश्वविजेत्यांचे गर्वहरण! शेवटच्या सामन्यात विजय मिळवत भारताने मालिका केली नावावर

Maratha Kranti Morcha : ‘मराठे काही विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही’, मराठी क्रांती मोर्चा आक्रमक

Electric Vehicle : व्वा! इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यावर वाचणार लाखो रुपये; वाचा कसं काय

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसने कोर्टात यायच्यावेळी घातलेल्या वकिलांच्या ड्रेसवरून चर्चांना उधानं आलं आहे. विशेष म्हणजे तिच्यावर आरोपत्र दाखल असून जामीन मंजूर करण्यात आलेला नसताना ती इतक्या बेधडकपणे थेट वकिलांच्या कपड्यांत कोर्टात आली यावरून नेटकऱ्यांनी जॅकलिनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिच्या या कामावरून निषेध व्यक्त केला आहे.

फसवणूक आणि मनी लाँड्रिंग रॅकेटचा मास्टरमाईंड सुकेश चंद्रशेखर याचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी संपर्क असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला होता. ज्यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत नोरा फतेहीचाही सहभाग आहे. या संपूर्ण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी नोरा फतेहीची चौकशीही केली आहे. सुकेश चंद्रशेखरकडून फसवणूक झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की, सुकेश चंद्रशेखर हा सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्याचा, न्यायाधीशाचा किंवा मोठ्या अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याचे भासवून श्रीमंतांची फसवणूक करायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने चौकशीदरम्यान कबूल केले की ती तिची मैत्रिण लीना पॉलच्या माध्यमातून ठग सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात आली होती.

आरोपपत्रानुसार, पिंकी जॅकलिनसाठी महागड्या भेटवस्तू निवडत असे आणि चंद्रशेखर त्याची किंमत देत असे. गिफ्ट दिल्यानंतर पिंकी जॅकलिनला तिच्या घरी पोहोचवायची. सुकेशने अनेक मॉडेल्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले. तसे, काही सेलिब्रिटींनी त्याच्याकडून भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला असल्याची माहितीही समोर आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी